शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

घाटाखाली कमळ फुलले

By admin | Updated: February 24, 2017 02:15 IST

शेगाव तालुक्यातील तीनपैकी दोन जागांवर भाजपचा कब्जा.

खामगाव, दि. २३- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आखाड्यात खामगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाला चांगली धोबी पछाड दिली आहे. जिल्हा परिषद गणांमधील ९ पैकी ९ जागांवर, तर पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १२ गणांवर भाजपने ताबा मिळविला आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील ७ पैकी ७ जिल्हा परिषद गणांचा समावेश असून, पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत मिळवित 'परिवर्तन' घडविले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातील सुटाळा जिल्हा परिषद गणामध्ये भाजपच्या मालुताई ज्ञानदेवराव मानकर यांनी काँग्रेसच्या सीमा संजय ठाकरे, घाटपुरी जिल्हा परिषद गणामध्ये भाजपच्या जयश्री विनोद टिकार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी जयश्री टिकार यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे अंत्रज-हिवरखेड गणामध्ये भाजपचे डॉ. गोपाळ रामदास गव्हाळे, अटाळी- आशाबाई ज्ञानदेव चिमणकर, कुंबेफळ सर्कलमध्ये भाजपच्याच सौ. महाले तर पिंपळगाव राजा - पुंडलिक भिकाजी बोंबटकार, लाखनवाडा- वर्षा अंबादास उंबरकर विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती सर्कलमध्ये भाजपचे विलास काळे, ऊर्मिला शरदचंद्र गायकी, दुर्गा महाले, राजेश तेलंग, तुषार गावंडे, भगवानसिंह सोळंके, रेखा युवराज मोरे, शीतल समाधान मुंढे, हरसिंग महादू साबळे, रामेश्‍वर बंड विजयी झाले, तर पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेसच्या मायावती इंगोले, मनीष ठाकरे, ज्योती सातव, पल्लवी पाटील विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे खामगाव मतदारसंघातील शेगाव तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद गणांसोबतच चार पंचायत समिती गणांपैकी दोन पंचायत समिती गणांवर ताबा मिळविला आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वर्षा वनारे यांना माटरगाव जिल्हा परिषद गटातून पराभव पत्करावा लागला. भाजपच्या स्वाती देवचे यांनी त्यांचा पराभव केला. जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची होम पीच म्हणून या मतदारसंघाची ओळख असली, तरी खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वातच या मतदारसंघातील निवडणूक लढविण्यात आली.