शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोटाबहाद्दरांकडून १६ हजारांचा दंड वसूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:07 IST

खामगाव:   उघड्यावरील हगणदरीला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये धास्तीखामगाव नगरपालिकेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:   उघड्यावरील हगणदरीला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान, शहरातील १३ पैकी दहा ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यात आल्यानंतर, उर्वरित तीन ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नोटिस दिल्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न देणार्‍या लोटाबहाद्दरांवर पालिका प्रशासनाच्यावतीने विविध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्या. या कारवाईलाही न जुमानता उघड्यावर शौचास करणार्‍या लोटाबहाद्दरांवर आता पालिकेने दंडात्मक कारवाईस प्रारंभ केला आहे. गुरुवारी १४ जणांवर कारवाई करण्यात आल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १८ जणांवर नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने कारवाई केली आहे. पाणीपुरवठा अभियंता तथा आरोग्य पर्यवेक्षक नीरज नाफडे,  आरोग्य निरीक्षक अनंत निळे, सुनील राजपूत, महेंद्र महितकर, मोहन अहीर, सुभाष शेळके यांनी ही कारवाई केली.

ग्रामीण गुड माँर्निंग पथकाची २३ जणांवर कारवाईखामगाव: पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी २३ जणांवर कारवाई केली. २३ नागरिकांना हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. हिवरखेड, नायदेवी, घारोड, लोखंडा  या गावांमध्ये तालुका ग्रामसेवक  बगळे, निमाडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शौचालय बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतरही काही नागरिक उघड्यावर शौचास येत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुसर्‍यांदा उघड्यावर आल्याचे निदर्शनास येताच १,२00 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल.    - नीरज नाफडे, अभियंता तथा आरोग्य पर्यवेक्षक, खामगाव.