शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आग लागून लाखोंचे नुकसान

By admin | Updated: April 1, 2017 02:00 IST

अचानक लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

लोणार, दि. ३१- शहरातील माउली नगरमध्ये राहत असलेल्या कृ.बा.स.सेवानवृत्त झालेल्या भास्कर घायाळ यांच्या राहत्या घराला ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात घायाळ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक कृ.बा.स. मधून सेवानवृत्त झालेल्या भास्कर घायाळ यांनी जीवनभराची पुंजी गुंतवून शहरातील माउली नगरमध्ये घर बांधलेले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान महिला घरातील कामे करण्यात व्यस्त असताना अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वच एकदम गोंधळून गेले. आग विजविण्यासाठी काय करावे, हे समजण्याच्या आत आगीने रोद्र रूप धारण केले. शेजारधर्म पाळत काहींनी लोणार नगर परिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधला. लोणार नगर परिषद अग्निशमन दलाने कार्य तत्परता दाखवत घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी भास्कर घायाळ यांची भेट घेऊन त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. तहसीलदार सुरेश कव्हळे यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊन पंचनामा करून योग्य ती मदत देण्याबाबत चर्चा केली. शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनीही आपदग्रस्त कुटुंबाला भेट देऊन मदत देण्याचे आश्‍वासन दिले.