शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षार्थींवर सीसी कॅम-याची नजर

By admin | Updated: March 9, 2017 01:41 IST

लोणार तालुक्यात पहिला प्रयोग; शिक्षण मंडळाकडून मिळाले आदेश.

सुलतानपूर(जि. बुलडाणा), दि. ८- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र १0 वीची परीक्षा सुलतानपूर येथील श्री शिवाजी हायस्कूल परीक्षा केंद्रावर ७ मार्चपासून सुरु झाली असून, परीक्षार्थी हे प्रथमच सीसी कॅमेर्‍याच्या नजरेखाली परीक्षा देत आहेत. लोणार तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग म्हणून नावारुपास आला आहे.सुरु असलेल्या १0 वी व १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत इन कॅमेरा घेण्यात याव्या, असे परीक्षा बोर्डाचे आदेश यापूर्वीच प्राप्त झाले असल्याने संस्थाध्यक्ष सुदेश लोढे यांनी सदर आदेशाचे पालन करीत परीक्षांचा कारभार पारदश्री चालावा व ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वबळावर उत्तीर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत टिकला पाहिजे, या उदात्त हेतुने त्यांनी स्वखर्चातून ७0 हजार रुपये खर्च केले व शाळेच्या प्रत्येक खोलीत व परिसरात सीसी कॅमेरे बसविले. सध्या सीसी टीव्हीच्या देखरेखीत चालणारी येथील श्री शिवाजी हायस्कूल ही लोणार तालुक्यात एकमेव शाळा असल्याने पारदश्रीपणे चालणार्‍या शालेय कारभाराबाबत सर्व नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. १५९४ क्रमांक असलेल्या या परीक्षा केंद्रावर स्थानीय नॅशनल उर्द् हायस्कूलचे ५0, सिद्धेश्‍वर हायस्कूलचे १२२ व शिवाजी हायस्कूलचे १0९ असे २८१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्र संचालक म्हणून प्राचार्य सुनील सोळंके तर उपसंचालक म्हणून गजानन दुशितवार हे काम पाहत आहेत.