शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोणार येथील गोदरी झाली मॉर्निंग वॉक ट्रॅक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:56 IST

लोणार : घरी शौचालय नसल्याने शहरातील काही रस्त्यांची  गोदरी झाली होती; मात्र मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि  नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी स्वच्छतेचा ध्यास धरून  त्यानुषंगाने स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे आज गोदरी ही  मॉर्निंग वॉक ट्रॅक झाली आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचा पुढाकार शौचालय बांधणार्‍या कुटुंबांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : घरी शौचालय नसल्याने शहरातील काही रस्त्यांची  गोदरी झाली होती; मात्र मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि  नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी स्वच्छतेचा ध्यास धरून  त्यानुषंगाने स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे आज गोदरी ही  मॉर्निंग वॉक ट्रॅक झाली आहे.स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी शहरांना  स्वच्छतेची व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देऊन हे  ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सं पूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे. याच  अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यात  स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ व हरित महाराष्ट्रासाठी  प्रभावीपणे राबविले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत  नगर परिषद क्षेत्र हगणदरीमुक्त झाले की नाही, याची चाच पणी करण्यासाठी राज्यस्तरीय तपासणी पथक लोणार येथे  १८ सप्टेंबर रोजी पोहोचले होते. पथकाने शहराची सर्वत्र  पाहणी केली असता, शहरातील असे काही कुटुंबे त्यांना  आढळून आले की आर्थिक परिस्थिती हलाखीची अस तानाही त्यांनी शौचालय बांधले आहे. हमाली करून  उदरनिर्वाह करणार्‍या शेख हारून शेख यासीन यांनी ६  बाय  १0  च्या घरात शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याने  शहरवासीयांसमोर एक नवा आदर्श घडवला आहे. त्यामुळे  एका कार्यक्रमात स्वच्छ महराष्ट्र अंतर्गत राज्यस्तरीय समि तीने शेख हारून शेख यासीन यांचा गौरव करीत स्वच्छ तेसाठी पुढाकार घेतलेल्या अनेक कुटुंबीयांना भेटी देऊन  त्यांची प्रशंसा केली. यावेळी अधिकारी व पदाधिकार्‍यांची उ पस्थिती होती. 

शौचालय बांधण्यात पुढाकार घेणार्‍यांचा सत्कारराज्यस्तरीय तपासणी पथकाने आर्थिक परिस्थिती नसताना  आणि अपुरी जागा असताना शौचालय बांधणार्‍या  कुटुंबीयांचा सत्कार केला. यावेळी समिती सदस्य तथा  अमरावती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेट्ये,  परतूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाराम इरलोळ, गजानन  महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सदस्य सतीश देवानंद  कायंदे यांच्यासह मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्ष  भूषण मापारी, उपनगराध्यक्ष साफियाबी बेगम नूर महम्मद  खान, सभापती सीमा नितीन शिंदे उपस्थित होते.

शहरातून ग्रामीण भागाकडे जाणार्‍या काही रस्त्याच्या वाटेवर  खुल्या जागेवरील गोदरी संपुष्टात आणून आज तो परिसर  मॉर्निंग वॉक ट्रॅक बनला आहे. लोणार शहर स्वच्छ व सुंदर  करण्यासाठी शहरवासीयांनी सिहांचा वाटा घेत पुढाकार घे तला आहे.- विजय लोहकरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, लोणार.