शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लोणार संवर्धन व संरक्षण समितीची एक वर्षानंतर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:01 IST

मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या लोणार संवर्धन व संरक्षण समितीची जवळपास एक वर्षानंतर लोणारमध्ये सहा जुलै रोजी बैठक होत आहे. दरम्यान, सात जुलै रोजी नागपूर खंडपीठात अनुषंगीक याचिकेच्या संदर्भाने सुनावणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.गेल्या वर्षी पाच जुलै आणि १९ आॅगस्ट रोजी लोणार सरोवर संवर्धन व संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यामुळे पुढील काळात ही बैठक होऊ शकली नव्हती तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोणार सरोवर क्षती प्रतीबंध तथा संवर्धन करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या या समितीचे अध्यक्ष असलेले आ. डॉ. संजय रायमुलकर यांचाच अपघात झाल्यामुळे समितीच्या पुढील बैठका होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू झाले होते.या सर्व पार्श्वभूमीवर आता सहा जुलै रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीत प्रामुख्याने सरोवरातील वेडी बाभूळ वनस्पती निर्मूलन, पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, झोपडपट्टी पूनर्वसन, लोणार सरोवरातील मंदिर व परिसरातील कामे तथा मध्यंतरी झालेल्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने दिलेल्या जवळपास १४ मुद्द्यांवरील आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.संपूर्ण सरोवर व लोणार परिसराच्या विकास आराखड्याचे डॉक्युमेंटेशनाची स्थिती, भोपाळ येथील स्कूल आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड आॅर्कियालॉजीला लोणार सरोवर एकात्मिक विकास आराखडा बनविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. या स्कूलच्या पथकाने गेल्या वर्षी दोनदा लोणार सरोवरास भेट देवून पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीही महसूल, पोलिस, वन्यजीव, पालिका, बांधकाम, पुरातत्व विभाग व संबंधीत यंत्रणेला लोणारचे व्हीजन डॉक्युमेंटेशन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यासंदर्भातील कामास मधल्या काळात प्रारंभही झाला होता.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवर