शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: पोलीस पाटील ‘डिटेक्टिव्ह’ म्हणून काम पाहणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:58 IST

निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटील निवडणूक आयोगासाठी ह्यडिटेक्टिव्हह्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे आदेश निर्देश जारी केले आहेत. 

शेगाव : लोकसभा निवडणूकीत गावच्या पोलीस पाटलांकडे निवडणूक आयोगाने मोठी जबाबदारी दिलीआहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटील निवडणूक आयोगासाठी ह्यडिटेक्टिव्हह्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे आदेश निर्देश जारी केले आहेत. पोलीस पाटील हा गावाचा केंद्रबिंदू असल्याने गावातील सर्व घडामोडी त्यांना अवगत असतात. कोणता कार्यकर्ता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, अशा कार्यकर्त्यांकडे येणारी दिवसभराची प्रचार वाहने, चौकात लागणारे निवडणूक प्रचार फ्लेक्सबाबतची इत्यंभूत माहिती इत्यादी जबाबदारी पोलीस पाटलावर देण्यात आली आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी प्रत्येक गावात गटातटाचे राजकारण असते. लोकसभा निवडणूकीतही मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. हा व्यवहार रोखून मतदारांनी निर्भीडपणे मतदानासाठी यावे, यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. मोठ्या गावांतील किराणा दुकानावर तसेच कृषि सेवा केंद्रे, औषध दुकान, चहा टपरी, हॉटेल यांसह गावातील मुख्य बाजारओळीत पोलीस पाटलांना डिटेक्टिव्ह म्हणून नजर ठेवावी लागणार आहे. याकरीता पोलीसांकडून पोलीस पाटलांना आदर्श आचारसंहितासंदर्भात संपुर्ण माहिती दिल्या जाणार असून जबाबदारीची जाणिव करवून दिल्या जाणार आहे. निवडणूक आयोगाने तसे निर्देश जारी केले आहेत.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkhamgaonखामगाव