शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : बुलडाणा मतदारसंघात दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; एक पदव्युत्तर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:32 IST

बुलडाणा : लोकसभा निवडणूकीसाठी बुलडाणा मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का अत्यल्प असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंतही झालेले नाही.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोकसभा निवडणूकीसाठीबुलडाणा मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का अत्यल्प असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंतही झालेले नाही. तर केवळ एकच उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक आहे. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करतांना दिसून येतात. मात्र प्रत्यक्षात लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राजकिय पक्ष व अपक्ष उमदेवारांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अत्यल्प आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 'लोकमत'ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. बुलडाणा मतदार संघात एकुण १२ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी चार उमदेवार बारावी पास आहेत. तीन उमेदवार दहावी पास असून दहावीपेक्षा कमी शिकलेल्यांची संख्या तीन आहे. एक उमेदवार वैद्यकिय शाखेचे शिक्षण घेतलेले तर एक संगणक शाखेचे पदवीधर आहे. जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

सर्वाधिक संख्या बारावी पासचीएकूण १२ उमेदवार रिंगणात असून केवळ दोन उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेले आहे. इतरांचे शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बुलडाणा  जिल्ह्याचे उमेदवार शैक्षणिक दृष्ट्याही  मागास असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यात ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. 

साक्षरतेत जिल्हा राज्यात बाराव्या स्थानीसाक्षरतेच्या बाबतीत बुलडाणा जिल्हा राज्यात १२ व्या स्थानी आहे. जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ८३.४ आहे. शहरी साक्षरता ८९.०८ तर ग्रामिण साक्षरतेचे प्रमाण ८१.८५ इतके आहे. साक्षरतेचा विचार केल्यास राज्यात जिल्ह्याची स्थिती चांगली आहे. असे असतांना उच्चशिक्षितांना राजकारणात रस नसल्याचे दिसून येत आहे. राजकारणात उच्चशिक्षितांनी आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. मात्र लोकसभा निवडणूकीसाठी उच्चशिक्षितांचे प्रमाण अत्यल्प आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक