शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने घरातील पैसा संपला, मात्र कोरोना संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. किराणा, भाजीपाला व इतर काही व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ...

जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. किराणा, भाजीपाला व इतर काही व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

यामुळे गर्दी कमी होऊन कोरोनाची साखळी तुटेल, असे प्रशासनाला वाटले; परंतु कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणारे, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. जीवनावश्यक किराणासुद्धा प्रशासनाच्या यादीतून त्यावेळी अनावश्यक झाला होता. त्यानंतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली असल्याने सध्या किराणा आणि भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना होत नाही आणि इतर दुकाने उघडली तर आणखी किती गर्दी वाढणार? आणि वाढणाऱ्या त्या थोड्याफार गर्दीमुळेच कोरोना होईल काय? असा प्रश्न व्यावसायिक वर्गामधून उपस्थित केला जात आहे.

घरखर्च भागवायचा कसा

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसायांचे गणित बिघडले आहे. सकाळी तीन ते चार तास थोडाफार व्यवसाय केल्यानंतर दिवसभर घरात बसावे लागत आहे, तर काहींचे व्यवसायच बंद झाल्याने घरखर्च भागवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्यापारी सोबतच मजूर वर्गही हताश

लॉकडाऊनमुळे दुकानांवर काम करणारे, तसेच इतर मजूर वर्गाच्या हातालासुद्धा काम नसल्याने तेसुद्धा हतबल झाले आहेत. शासनाने मोफत स्वरूपात केवळ गहू व तांदूळ दिले आहेत. तेव्हा त्यावर कसे जीवन जगायचे? इतर लागणारा किराणा आणण्यासाठी पैसा आणायचा तरी कोठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.