शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या मृतदेहासहीत स्थानिकांचा शाळेसमोर ठिय्या

By admin | Updated: March 30, 2017 15:13 IST

देऊळघाट येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत

 
बुलडाणा, दि. 30 - राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात जनूना येथील विद्यार्थी निवृत्ती चंडोल जखमी झाला होता. या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जनूना येथील नागरिकांनी गुरूवारी सकाळी स्कूलमध्ये मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका गावक-यांनी घेतल्याने वातावरण तापले होते.
 
राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान रून नं. पाचमध्ये स्फोट झाला. या स्फोटात जनूना येथील वर्ग पाच मध्ये शिक्षण घेत असलेला आदिवासी समाजाचा विद्यार्थी निवृत्ती चंडोल (वय ११) हा जखमी झाला. त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र निवृत्तीची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. येथे उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचे निधन झाले. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह जनूना येथे आणण्यात आला. 
 
यावेळी शेकडो गावकरी त्याचा मृतदेह घेऊन शाळेत दाखल झाले. यावेळी निवृत्तीच्या पालकांनी व गावातील नागरिकांनी आक्रोश करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. जापर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका गावक-यांनी घेतल्याने वातावरण तापले होते. जवळपास तीन तास निवृत्तीचा मृतदेह घेऊन गावकरी शाळेसमोर उभे होते. यावेळी पोलिसांनी गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकरी ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी निवृत्तीचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन जाण्याचे ठरवण्यात आले. 
 
पोलीस कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून अखेरीस मृतदेहाची विटंबना होवू नये म्हणून गावकरी मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेवून गेले.
 
स्फोट कशाचा?
राजीव गांधी मिल्ट्री स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलाचा स्फोटाने मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, हा स्फोट कशाचा होता, याच गूढ कायम आहे. पोलीस व शाळा प्रशासनाने सदर स्फोट हा पेन्सिल सेलचा असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पेन्सिल सेलच्या स्फोटाने मुलाचा मृत्यू होवू शकत नाही. हा सेल मुलाकडे कोठून आला. असे प्रश्न मुलाचे पालक उपस्थित करीत आहे. मुलगा सेलसोबत खेळत असताना स्फोट झाल्याचे शाळा प्रशासन सांगत आहेत.  हा स्फोट कशाचा झाला, याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही.