खामगाव (जि. बुलडाणा): कर्जबाजारीपणामुळे वृद्ध शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी तालुक्यातील घारोड येथे उघडकीस आली.नामदेव विठोबा मिसाळ (७0) असे मृतक शेतकर्याचे नाव असून, त्यांनी २३ जूनला रात्री घरासमोरील ओसरीत छताच्या बल्लीला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ जून सकाळी उघडकीस आली. सदर शेतकर्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज आहे. सदर कर्ज वसुलीबाबत बँकेकडून मिसाळ यांना काही दिवसांपूर्वी नोटीस मिळाली असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. सततच्या नापिकीमुळे कर्ज भरण्यास ते असर्मथ ठरले होते. यामुळे आलेल्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली.
कर्जबाजारी शेतक -याची आत्महत्या
By admin | Updated: June 24, 2016 23:36 IST