शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांचा कर्जपुरवठा ठप्पच!

By admin | Updated: June 24, 2017 05:38 IST

सभासद महिलांची होत आहे अडचण.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बचतगटांचा कर्जपुरवठा विविध फायनान्स कंपन्यांनी थांबवलेला आहे. त्यामुळे विविध बचत गटांच्या सभासद महिलांची अडचण होत असून, कर्जपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या व काही बँकांकडून बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात येत होता; परंतु सुमारे १0 महिन्यांपूर्वी अमरावती जिल्हय़ात काही बचतगटाच्या महिलांनी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारी करून कर्जाची परतफेड थांबवली. अकोला, बुलडाणा जिल्हय़ातही काही बचतगटाच्या सभासदांनी कर्जाची परतफेड करणे थांबवले. बचतगटांचे कर्ज माफ झाल्याची अफवासुद्धा पसरली होती. त्यामुळे काही फायनान्स कंपन्यांचे नुकसान होऊ लागल्याने त्यांनी नव्याने कर्जवाटप करणे बंद केलेले आहे. खामगाव शहर व परिसरात ग्रामशक्ती (फुलर्टन) ग्रामीण कुटा, एल अँन्ड टी, दिशा फायनान्स, निर्मल-उज्ज्वल, एचडीएफसी बँक आदींकडून बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात येत होता. यातील ग्रामीण कुटा, एचडीएफसी बँक यांचा कर्जपुरवठा सद्यस्थितीत सुरू आहे; मात्र अन्य काही कंपन्यांच्यावतीने अद्याप कर्जपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. त्यामुळे महिला सभासदांची अडचण होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू होत असतानाच्या काळात या फायनान्स कंपन्यांकडून नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या सभासद महिलांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी ५ ते १५ हजार रुपयांपर्यंंंतचे कर्ज दिले जात असते. ते यावर्षी अनेक बचत गटांना मिळू शकले नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या काळात त्यांची अडचण झालेली आहे. वसुली नसल्याने वाटप बंदज्या फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीवर परिणाम झाला त्याच कंपन्यांनी नवीन कर्जवाटप बंद केलेले आहे. तर ज्यांची वसुली व्यवस्थित सुरू आहे, त्या कंपन्यांनी वाटप सुरू ठेवलेले आहे. थकबाकीचे प्रमाण कमी झाल्यास थांबलेले वाटप पूर्ववत सुरू होऊ शकते अशी माहिती एका कंपनीच्या अधिकार्‍याने दिली.ग्रामीण कुटाच्या वतीने बचत गटांचे कर्जवाटप सुरूच आहे. वसुली पूर्ण होत असल्याने वाटप थांबविण्याचा प्रश्नच नाही. मे, जून व जुलै महिन्यात आम्ही दरवर्षी शैक्षणिक कर्जाचे वाटप करतो. ते यावर्षीही देण्यात येत आहे. महिलांनी कर्जाची परतफेड नियमीतपणे केली तर त्यांना कोणतीच अडचण येणार नाही.-रवीकुमार सूर्यवंशीशाखा व्यवस्थापक, ग्रामीण कुटा