शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांना केले पोलिसांच्या हवाली

By admin | Updated: September 9, 2014 19:02 IST

गांगलगाव येथील महिलांनी गावात अवैधरित्या दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार पुकारत त्यांच्याकडील अवैध दारूचा साठा जप्त केला

चिखली : गांगलगाव येथील महिलांनी गावात अवैधरित्या दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार पुकारत ७ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडील अवैध दारूचा साठा जप्त केला व अंढेरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. या कामी जवळपास ४५ महिला व नागरिकांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईसाठी अंढेरा पोलिसांना भाग पाडले. हिरकणी महिला ग्रुपच्या या सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहता ठाणेदार नाईकवाडे यांनी पाच अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत यापैकी पूर्वी गुन्हय़ाची नोंद असलेल्या आरोपींना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. गांगलगाव येथे वंदना घुगे, संगीता फुल्लारे, प्रकाश खरात, तात्याबा खरात व ज्योती उद्धव म्हस्के हे अवैध देशी दारू विकतात. ७ सप्टेंबर रोजी महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू ताब्यात घेतली व पोलिसांना बोलावले. पोलिसांनी अवैध दारू विकणार्‍यांना ताब्यात घेतले, तर इतर तीन आरोपी फरार झाले. या प्रकरणानंतर हिरकणी महिला ग्रुपच्या अध्यक्षा मंदाबाई देवेंद्र आराख, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव म्हस्के, सरपंच बबनराव म्हस्के, पोलिस पाटील भगवानराव सावळे, माजी सरपंच मदनराव म्हस्के, अशा प्रमुख कार्यकर्त्यासह ५0 ते ६९ महिला अंढेरा पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली. अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये हा सर्व प्रकार सुरू असताना हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वृषालीताई बोन्द्रे यांनी दूरध्वनीवरून ठाणेदारांशी संपर्क साधून दारूबंदीसाठी सरसावलेल्या महिलांना सहकार्य करण्याचा आग्रह धरला. यावेळी चंद्रकला आराख, सविता आराख, शोभा आराख, उषा आराख, कौशल्याबाई आराख, अलका बोर्डे, मिनाबाई आराख, दुर्गा बोर्डे, कमलबाई आराख, आशा आराख आदींसह सुमारे ४५ महिला व ग्रामस्थ उपस्थित होते..