शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

आदीवासी विद्यार्थ्यांना टॅबवर शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 15:32 IST

बोराखेडी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा ग्रामस्थांच्या लोकसहभागातून  व शिक्षकांच्या पुढाकाराने शंभर टक्के डिजीटल बनली आहे.

मोताळा: माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या सोयी व सुविद्या पोहोचत नाहीत. त्यामुळेते शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकन नाहीत. स्पर्धेच्या युगातील हीगरज ओळखून शहरानजीकच्या बोराखेडी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिकशाळा ग्रामस्थांच्या लोकसहभागातून  व शिक्षकांच्या पुढाकाराने शंभर टक्केडिजीटल बनली आहे. त्यामुळे पूर्वी जी मुले शाळेतच जायची नाहीत, तीच मुलेआज दररोज शाळेत जावून टॅबवर शिक्षण घेत आहेत.    बोराखेडी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीते आठवी पर्यंतंचे वर्ग आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह आठ शिक्षक व ३०६विद्यार्थी आहेत. इयत्ता पहिली, दुसरी व आठवी सेमी तथा इयत्ता तिसरी तेसातवीपर्यंत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. शाळेला आयएसओचा दर्जाप्राप्त झाला असून, तालुक्यात मान मिळविणारी बोराखेडीची जिल्हा परिषदशाळा पहिली आहे. राज्यातील ई-लर्निंगच्या उपक्रमात तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या शाळांनी कात टाकली असून, मोताळा तालुका अग्रेसर आहे. हाउपक्रम राबवितांना लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. थोड््याशाप्रयत्नामुळे शाळांमध्ये परिणामकारक बदल घडून आल्याचे पहावयास मिळत आहे.परिणामी खेडी, टाकळी व बोराखेडीची शाळा टॉपवर असून, ह्या शाळाही कशापद्धतीने दर्जेदार बनविल्या जाऊ शकतात, हे ई-लर्निंगने शिकविले आहे.बोराखेडी शाळेत लोकसहभागामुळे ई-लर्निंंग उपक्रमाच्या माध्यमातून संगणक,एलसीडी, प्रोजेक्टर, ईन्वरर्टर, डिजीटल मोबाइल, टॅब, लॅपटॉप आदी सुविद्याउपलब्ध झाल्याने शिक्षणाविषयीची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झालीअसून, जिज्ञासाही वाढली आहे.  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गतराज्य शासनाच्या निर्णयानुसार बोराखेडीच्या शाळेने ई-लर्निंगचा कार्यक्रमराबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालक सभा, मेळावे, बैठका घेऊनमुख्याध्यापक चव्हाण व शाळेतील इतर शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीनेमागील तीन वर्षात ही किमया करून दाखविली आहे. परिणामी आज रोजी या शाळेतीलवर्ग १ ते ८ चे वर्ग आता पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानानुसार चालू आहे.ई-लर्निंगसह अन्य आधुनिक सुविद्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अवघड विषयांचीगोडी वाढली आहे. विद्यार्थ्याना डिजीटल मोबाइल, टॅब व लॅपटॉपसह कृतियुक्तशिक्षण दिल्या जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येआंतरक्रिया घडविणारे शिक्षण मिळत असल्याचे मुख्याध्यापक अनिल चव्हाणयांनी सांगितले.कॉन्व्हेंटचे वाढते फॅड पाहून या शाळेचा ड्रेस कोड पूर्णपणे बदल केलाआहे. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना टाय, बेल्ट, शूज, ओळखपत्र,शालेयगणवेश व आधारकार्ड शाळेकडून वितरित करण्यात आले आहेत. शिक्षकांकडे वर्ग १ते ८ वी पर्यंतचे मराठी व इंग्रजी माध्यमाचे सॉफ्टवेअर शाळेत उपलब्ध आहे.शाळेतील शिक्षक  पूरक मार्गदर्शन म्हणून विद्यार्थ्यांना अँड्रॉइडच्यासॉॅफ्टवेअर द्वारे शिकवितात. त्यामुळे या शाळेत स्मार्ट विद्यार्थी घडतअसून बोराखेडीची शाळा मॉडल स्कूल म्हणून नावारूपास आली आहे. शाळेतीलभौतिक सुविद्या, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन व शाळेसहविद्यार्थ्यांमध्ये होत असलेला परिपूर्ण बदल पाहता सीईओ दीपा मुधोळ,शिक्षणाधिकारी देशमुख यांनी जिल्हाभरातील शिक्षकांना बोराखेडी येथीलशाळेला भेट देऊन आपली शाळासुद्धा शंभर टक्के प्रगत करावी अश्या सुचनादिल्या आहेत. परिणामी या सत्रात आतापर्यंत या शाळेला जवळपास ६०० शिक्षक वअधिकाऱ्यांनी भेटी देवून प्रगतीचा आढावा घेतलाआहे. यामध्ये यवतमाळ, पुणे,हिंगोली, जळगाव, नागपूर व एनसीआरटी संस्थेचा समावेश असून, जिल्हातीलसंग्रामपूर, मलकापूर, खामगाव, नांदुरा, बुलडाणा, शेगाव, चिखली पंचायतसमितीमधील ५५० शिक्षकांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)