शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीतून ग्रामस्थांनी घेतला धडा!

By admin | Updated: August 4, 2014 23:22 IST

हिवरखेड : गावात चारा डेपो सुरू करण्याचा निर्धार

खामगाव: तालुक्यातील हिवरखेड येथे चारा टंचाई आणि वातावरणातील बदलामुळे शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली होती. यामुळे गावातील पशुपालक आणि शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या कटू घटनेतून बोध घेत हिवरखेड ग्रामपंचायतीने पशुपालक आणि शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.गत आठवड्यात या एकाच गावातील शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली. यानंतर गावातील पशुपालक आणि शेतकर्‍यांना विविध योजनेतून मदत मिळवून देण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. यासंदर्भात विविध ठराव ग्रामपंचायतीने नुकत्याच पार पडलेल्या सभेत पारीत केले आहेत. आपल्या विविध मागण्यांचा प्रस्तावही ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव येत्या एक-दोन दिवसांत महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे २५ जुलै रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे दीडशेच्यावर जनावरे मृत्यूमुखी पडली होती. यासाठी गावातील चारा टंचाई कारणीभूत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे हिवरखेड परिसरात चारा डेपो सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायतीत पारीत करण्यात आला. या शिवाय अत्यल्प पावसामुळे दुबार पेरणीचे संकट कोसळलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी कर्जबाजारी शेतकर्‍यांना दिलासा म्हणून शासकीय योजनेतून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात यावी. याशिवाय मोठय़ा प्रमाणात जनावरे मृत्यूमुखी पडलेल्या पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावरून आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा ठरावही यावेळी घेण्यात आला. सरपंच मनोहर पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी पार पडलेल्या या सभेला सचिव ए.के. अंभोरे, उपसरपंच श्रीराम धंदरे, सदस्य कलाबाई कडाळे, तुकाराम गवई, गजानन वानखडे आदी सदस्य उपस्थित होते. ** शेतकरी जगविण्यासाठीच धडपड!पावसाच्या लहरीपणामुळे हिवरखेड परिसरातील अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असतानाच पशुपालक शेतकर्‍यांची शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली. नैसर्गिक आपत्तीमुळे हिवरखेड येथील शेतकरी आणि पशुपालकांवर दुहेरी संकट कोसळले आहे. तालुक्यात सर्वाधिक हानी हिवरखेडमध्ये झाली आहे. शासनाने गावातील शेतकरी, पशुपालक जगविण्यासाठी मदत द्यावी, अशी ग्रामपंचायतीची भूमिका असून त्यादिशेने चारा डेपो सुरू करण्यासोबतच शेतकर्‍यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी रेटा दिल्या जाणार असल्याचे ग्रामपंचायतीचे प्रयत्न असल्याचे चित्र आहे.