शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे सामूहिक विवाहाकडे पाठ

By admin | Updated: May 15, 2015 23:18 IST

आयोजन संस्था गेल्या कुठे; वेळ व पैशाच्या बचतीकडे झाले दुर्लक्ष.

बुलडाणा : पारंपरिक विवाह सोहळ्यात वर्‍हाड्यांवर होणारा खर्च पाहता काही वर्षांपूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची प्रथा सुरू झाली होती; मात्न अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे तसेच अनुदान थेट वधूवरांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे संस्थेसह लग्न इच्छुकांनी आता या सामूहिक विवाहाकडे पाठ फिरविल्याचे चित्न दिसत आहे. परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. विवाह हा एक पवित्न संस्कार असून, प्रत्येकाने विवाह करावा, अशी समाजधारणा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती विवाह करतो. या विवाहासाठी पैसा हा मूलभूत घटक असतो. प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीनुसार विवाहाचे सोपस्कार पार पाडण्याचा प्रयत्न करतो. जसजसे समाजात परिवर्तन होत आहे. तसतसा विवाहाच्या स्वरूपात बदल होत चालला आहे. आठ-आठ दिवस चालणारे लग्न आता केवळ एका दिवसावर येवून ठेपले आहे. लग्न एकच वेळ होते. म्हणून पैशाची उधळपट्टी करण्यात कसलीही कसर सोडली जात नाही. हे सर्व श्रीमंतासाठी ठीक असते; परंतु सर्वसामान्यांसह गरीब माणसाचे काय? अशा लोकांसाठी एका मुलीचे लग्न करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. यातूनच सामूहिक विवाहाची परंपरा पुढे आली. लग्नावर होणार खर्च हा कमीत कमी व्हावा, या उद्देशातूनच विविध जातीच्या संघटना आपल्या जातीतील सर्वसामान्यांना व गरीब माणसाच्या मदतीला धावून आल्या आणि त्यातून सामूहिक विवाह सोहळे जन्माला आले. आपल्या जातीतील लोकांचा विवाहावर अतिरिक्त खर्च होऊ नये, पैशाची बचत व्हावी, म्हणून सामूहिक विवाह आयोजक संस्था मागील बर्‍याच वर्षांपासून कार्यान्वित होत्या. सुरुवातीला या संघटनांना मोठा पाठिंबा समाजाने दिला. एका सामूहिक विवाहात ५0 पेक्षाही जास्त वर- वधूंचे विवाह पार पाडले जात होते; मात्र अलिकडे परिस्थिती बदलू लागली आहे. सामूहिक विवाहात मुलामुलींचे विवाह करण्याचा कल कमी होत आहे. यामुळे आगामी काळात सामूहिक विवाहासाठी जोडपे मिळणार की नाही, अशी शंकाही निर्माण होत आहे.