शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाण्याच्या शोधात बिबट्याचा गावालगत संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 11:41 IST

Leopards roam the village in search of water : नरवेल येथे बिबट्याने पंधरा दिवसांत दोन पशू ठार केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनरवेल : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, कडक उन्ह तापत आहे. जंगलातील पाणीसाठे आटल्यामुळे वन्यप्राणी गावाकडे वळले असून, नरवेल येथे बिबट्याने पंधरा दिवसांत दोन पशू ठार केले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.नरवेल येथे बिबट्याने पंधरा दिवसांपूर्वी वासराला ठार केले होते; परंतु ग्रामस्थांनी आरडाओरडा  केल्यामुळे वासरू तिथेच सोडून बिबट पळून गेला होता. वनरक्षक यांनी नरवेल येथे भेट वासराची पाहणी करून बिबटने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान बिबट्याने परत गोठ्यामध्ये असलेल्या गुरांवर हल्ला केला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी जागी होऊन नर्सरीमध्ये बॅटरीच्या साह्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट आढळून आला नाही. वनरक्षक यांना गिरीश कोलते यांनी संपर्क करून माहिती दिली असता वनरक्षक तसेच त्यांची पूर्ण टिमने घटनास्थळी येऊन तीन पर्यंत गस्त घातली; परंतु बिबट्या  निदर्शनास पडला नाही. पुन्हा तीन वाजताच्यादरम्यान शांतता झाल्यावर बिबट्याने बकरीच्या पिलावर हल्ला केला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रामस्थ आणि पशुधन मालक यामुळे चिंतेत सापडले आहे.   

कठोरा भास्तन परीसरात बिबट्याचे दर्शन   जलंब येथून जवळच असलेल्या कठोरा- भास्तन शिवारामध्ये एका इसमाला बिबट दिसल्याने परीसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कठोरा येथील रहीवाशी अनंता खवले ८ एप्रिल रोजी सायंकाळी भेंडवळवरून  आपल्या दुचाकीने घराकडे परत येत असताना त्यांना कठोरा भास्तन शिवारात एका शेतामध्ये शेततळ्याजवळून एक बिबट जाताना दिसला. यामुळे परीसरातील नागरीक, शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे.   

टॅग्स :khamgaonखामगावleopardबिबट्या