शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

रोपवाटिकेतील कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला; नळगंगा नजीकच्या घटना, परिसरात खळबळ

By निलेश जोशी | Updated: June 30, 2024 18:22 IST

तालुक्यातील नळगंगा धरणानजीक सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी नारायण सैरीसे (रा. खामगाव ह. मु. मोताळा) व काही मजूर काम करतात.

मोताळा : रोपवाटिका मध्ये काम करत असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना नळगंगा धरणानजीकच्या रोपवाटिकेत २९ जूनच्या सायंकाळी घडली. नारायण श्रीराम सैरीसे (३०) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील नळगंगा धरणानजीक सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी नारायण सैरीसे (रा. खामगाव ह. मु. मोताळा) व काही मजूर काम करतात. दरम्यान, २९ जूनच्या सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास सर्व मजूर कामावरून परत गेल्यावर नारायण सैरीसे हे रोपवाटिकेतून बाहेर निघत होते. यावेळी त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी सैरीसे यांनी आरडाओरडा केला असता, नर्सरीसमोरून जाणाऱ्या काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात नारायण सैरीसे यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रशांत राजपूत व रोजगार सेवक संदीप मापारी यांनी जखमी नारायण सैरीसे यांना उपचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

--नर्सरीत दोन बिबट्यांचा मुक्त संचार; वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष--तीन ते चार दिवसांपूर्वी नारायण सैरीसे यांना या रोपवाटिकेत दोन बिबट मुक्त संचार करताना दिसून आले. यावेळी सैरीसे यांच्या सोबत असलेल्या नर्सरीतील कुत्र्यांनी बिबट्यांच्या दिशेने भुंकायला सुरुवात केली. तसेच सैरीसे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे दोन्ही बिबट्यांनी पळ काढला. ही बाब सैरीसे यांनी मोताळा सामाजिक वनीकरणचे आरएफओ शिपे यांच्या कानावर घातली होती. परंतु यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यानंतर सैरीसे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर ही घटना घडली नसती, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या