शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाडेतत्त्वावरील वर्गखोल्या परत घेणार!

By admin | Updated: November 25, 2015 02:04 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेने शाळांमधील काही वर्ग खोल्या खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या होत्या.

बुलडाणा: जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिनियम धाब्यावर बसवून बुलडाणा जिल्हा परिषदेने आपल्या मालकीच्या शाळांमधील काही वर्ग खोल्या खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. शिक्षण समितीने ठराव घेऊन या खोल्या भाड्याने दिल्या होत्या; मात्र लेखा परीक्षणात ही कृती नियमबाहय़ असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली आहे. या सर्व वर्ग खोल्या खाली करण्याबाबत संबंधित संस्थांना शिक्षण विभागाने नोटीस बजावल्या आहेत. बुलडाणा मुख्यालयाच्या जवळच असलेले देऊळघाट, रायपूर, धाड व साखळी बु. या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील काही खोल्या खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. जून २0१0 पासून हा भाडेपट्टा नाममात्र दराने सुरू असून, या संस्था जिल्हा परिषद वतरुळातीलच काही पदाधिकार्‍यांच्या प्रभावात आहेत त्यामुळे शिक्षण समितीने ठराव घेऊन संबंधित संस्थांना वर्ग खोल्या भाड्याने दिल्या होत्या. वास्तविक जिल्हा परिषदेची मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यासाठी म.रा. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये कलम १२८ ब २ नुसार सक्षम प्राधिकार्‍याची मंजुरी किंवा सर्वसाधारण सभेपुढे हा विषय ठेवणे आवश्यक होते. लेखा परीक्षणात ही बाब समोर आल्यामुळे शिक्षण विभागाला जाग आली असून, या वर्ग खोल्या तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायपूर येथील संस्थेने याबाबत कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती असून, इतर संस्थांना ६ नोव्हेंबर रोजी आदेश बजावूनही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी या संदर्भात शिक्षण विभागाला वर्ग खोल्या खाली करण्याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना कामाला लावले असून, कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.