शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांवर प्रेम करणे शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:25 IST

खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

ठळक मुद्देडॉ.सावजींनी सांगितले जीवनशैली बदलून आयुष्य वाढविण्याचे उपायतरुणाई फाउंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.येथील कोल्हटकर स्मारकमध्ये २२ ऑगस्ट रोजी ‘निरोगी राहा, दीर्घायुषी बना’ या विषयावर  व्याख्यान झाले. यावेळी नगराध्यक्ष अनिता डवरे, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा, उद्योजक अनिल विकमसी, तरुणाई फाउंडेशन अध्यक्ष नारायण पिठोरे यांची उपस्थिती होती. वृक्ष पूजनाने व अतिथींना वृक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ.सावजी यावेळी म्हणाले, की मानवी शरीराची रचना १२0 वर्षे जगण्याची आहे; मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आयुष्याला धोकादायक स्थितीत आणून ठेवले आहे. आपल्या संस्कृतीतील जुन्या आहार पद्धतीला फाटा दिल्याने अनेक आजार ओढवून घेतले आहेत. हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वापरत असताना आपण सहजपणे करता येण्यासारखे उपाय दुर्लक्षित करीत आहोत, वाढते वजन, व्यसनाधीनता व नैराश्य पसरलेल्या संपूर्ण समाजालाच आजाराची लागण झाली आहे. या सर्व व्याधींमधून बाहेर कसे पडावे, यावर डॉ.सावजींनी अनेक छोटे व सहज करण्यासारखे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे तर प्रास्ताविक उमाकांत कांडेकर यांनी केले. तरुणाईचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी आभार मानले.

मुलांना नकार ऐकायची सवय लावाआपल्या मुलांना नाही ऐकायची सवय लावा, त्यांना सहजपणे सर्व उपलब्ध करून देत आपण त्याचे पुढील आयुष्य खराब करीत असतो. जीवनात संकट, अडचणी, आव्हान याचा सामना करण्याची त्यांची शक्ती वाढली पाहिजे. आज अनेक पालक मुलांना गाड्या, मोबाइल व इतर अनावश्यक बाबी अगदी लहान वयात हातात देतात. ही मुले पुढे हमखास नैराश्यामध्ये पडतील. त्यांना अनेक आजार जडतील. त्यांना अभ्यासाचा ताण देऊ नका. इतरांशी स्पर्धा, तुलना करू नका, त्यांना भरपूर खेळू द्या, असेही ते म्हणाले.

का जगायचे हे शोधा..यावेळी डॉ.सावजी म्हणाले, की प्रत्येकाला आपल्या जीवनासाठी उदात्त हेतू असणे आवश्यक आहे. फक्त मी व माझे केल्याने आजार बळावतात. का जगायचे, हे शोधा म्हणजे कसे जगायचे, हा प्रश्न पडणार नाही.-