शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 00:03 IST

शेगाव येथे लक्ष्मीपूजनाचा सोहळा पारंपारीक पध्दतीने मंगलमय वातावरणात पार पडला.

गजानन कलोरे शेगाव, दि. ३१-श्री गजानन महाराज संस्थानमध्ये ३0 रोजी लक्ष्मीपूजनाचा सोहळा पारंपारीक पध्दतीने यावर्षीही उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. संध्याकाळी झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह इतर विश्‍वस्त व भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.दिवाळीनिमित्त श्रींच्या मंदीरावर नयनरम्य व दैदिप्यमान विद्युत रोषनाई करण्यात आली होती. ही आरास उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. मांगलीक वातावरणात शिस्तबध्द पध्दतीने श्रींच्या मंदीरात दिपावलीच्या निमित्ताने संस्थानच्या कार्यालयात पारंपारीक पध्दतीने लक्ष्मी देवीची मुख्यपुजा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विश्‍वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, चंदुलाल अग्रवाल, सदस्य अभियांत्रिकी महाविद्यालय शरद शिंदे, रामेश्‍वर काठोळे, भक्तगण आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी संस्थानमधील हत्तीण 'लक्ष्मी'चे पूजन शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भक्तांनी शिस्तबध्द पध्दतीने पुजेचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने प्रत्येक भक्तांना कुंकुमतीलक करण्यात आले. तसेच लाही मुरमुरे बत्ताशाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदीर परिसरात संस्थानच्या वाहनांची रांगेत पुजा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे गावातील रहिवाशांनी श्रींच्या मंदीरात पुजेचे दर्शन रात्री उशिरापर्यंत घेतले. मंदीर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. मंदीर परिसरात व भक्तनिवास परिसरात केळीचे खांब व दिपमाळा आकर्षण ठरले.