अंगणवाडी क्रमांक २ मध्ये सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच अशोक रिंढे यांनी केले. तर ग्रामसेवक रतीलाल पंढरे, पोलीस पाटील शिवाजी रिंढे , ग्राम पंचायत सदस्य नंदकिशोर रिंढे, गजानन झगरे, किसन साळवे, विमल तेजराव काळे, संगीता रिंढे, दिलीप काळे, विलास रिंढे, ज्ञानेश्वर रिंढे, मधुकर रिंढे, रमेश इंगळे, सचिन इंगळे, जिजाबाई इंगळे, विशाल इंगळे, गजानन काळे, गजानन मापारी, प्रशांत इंगळे, नंदु इंगळे, आशा सेविका योगीता नरवाडे यांची उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका आशा इंगळे व मदतनिस कल्पना इंगळे यांनी योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली. मुलींच्या जन्माचे स्वागत, कोविड लसीकरण, स्वच्छता अभियान आणि गरोदर माता यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक राहुल इंगळे यांनी केले.
मोहाडी येथे पोषण मास उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST