शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात मत्स्य विकासाला चालना

By admin | Updated: November 17, 2014 00:41 IST

जनुना तलावातील मासोळ्या काढण्यास प्रारंभ : पालिकेचे उत्पन्न पोहोचले ३३ लाखांवर.

खामगाव (बुलडाणा): केंद्र शासन व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धन विकास महामंडळाच्या कुठल्याही मदतीविना खामगाव नगरपालिकेच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या जनुना तलावातून मासोळ्या काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता खामगावसह परिसरातील नागरिकांना ताज्या मासोळींची चव चाखायला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खामगाव नगरपालिकेच्या उत्पन्नात तब्बल तीसपटीने वाढ झाली आहे. खामगाव शहरापासून जवळच असलेल्या जनुना परिसरात खामगाव नगरपालिकेच्या मालकीचा २२0 एकराच्या विस्तीर्ण परिसरात १५0 वर्षे जुना तलाव आहे. या इंग्रजकालीन तलावाचा पूर्वी पाणीपुरवठय़ासाठी वापर केला जायचा. मात्र, वाढलेली लोकसंख्या व नवीन मंजूर झालेल्या जलशुद्धीकरणासह पाणीपुरवठा योजना यामुळे जनुना तलाव कालबाह्य होऊन गेल्या सात-आठ वर्षांपासून हा तलाव शोभेची वस्तू बनला होता. याच काळात तलावातील माश्या काढण्यासाठी स्थानिक मासेमारांना एक ते दोन लाख रुपयांमध्ये मासेमारीसाठी परवानगी दिली जायची. यामुळे महापालिकेला फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे गेल्यावर्षी प्रथमच खामगाव नगरपालिकेने जनुना तलावामध्ये लाइव्ह फिश डेव्हलपमेंट या अभिनव प्रकल्पाची आखणी केली. परिसरासह जिल्ह्याबाहेरील मत्स्यव्यवसाय विकासकांना जाहीर निविदेद्वारे आमंत्रित करण्यात आले. त्यानुसार मत्स्य व्यवसायासाठी जळगाव खान्देश येथील मयुराज सहकारी मत्स्यव्यवसाय संस्थेशी तीन वर्षांसाठी करारनामा करण्यात आला. या करारनाम्यापोटी पहिल्या वर्षी पालिकेला ९.५0 लाख रुपये मिळाले. दुसर्‍या वर्षी यामध्ये दहाटक्के वाढ होऊन १0.५0 लाखांचा अग्रीम मिळाला आहे, तर तिसर्‍या वर्षी पुन्हा दहाटक्के वाढ गृहित धरून ११.५0 रुपये अशाप्रकारे पालिकेला तीन वर्षांमध्ये ३३ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. दरवर्षी मत्समारीमुळे खामगाव नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.