शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहेरी येथील प्राथमिक शाळेत ई- लर्निंग कक्षाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 01:23 IST

गावक-यांनी लोकवर्गणीतून घेतला ई-लर्निंगचा संच.

राहेरी(जि. बुलडाणा), दि. २९: प्राथमिक शाळेतील शुक्रवारी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते ई-लर्निंग कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. सदस्य विनोद वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार सेवानंद वानखेडे, तालुका प्रमुख बाळु काळे होते. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्याचा मानस येथील नागरिक वीरेंद्र देशमुख यांनी गावकर्‍यांच्या समोर व्यक्त केला. गावकर्‍यांनीसुद्धा त्याला प्रतिसाद देऊन लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीला ई-लर्निंगचा संच विकत घेऊन दिला, तर तंटामुक्त निधीतून ग्रामपंचायतीने ३0 हजार रुपये देऊन संच आणण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांंचा बौद्धिक वाढ होणेसुद्धा आवश्यक असल्याचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. ठाणेदार वानखेडे म्हणाले की, विद्यार्थी व पालक या दोघांमध्ये अभ्यासाबद्दल सुसंवाद असला पाहिजे. आपला मुलगा काय करतो, वर्गात काय शिकतो, याकडे प्रत्येक पालकाचे लक्ष असले पाहिजे, त्यामुळे पाल्यावर वचक राहतो. यावेळी कार्यक्रमास सरपंच मालतीबाई देशमुख, उपसरपंच ज्योती देशमुख, बाळाराम केवट, शिवाजी देशमुख, बालाप्रसाद फलटनकर, आनंद देशमुख, भीमराव गवई, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख, समाधान गवई, बबन गवई, मधुकर मगर, मदन देशमुख, बालाजी देशमुख, धनंजय देशमुख, नितीन गवई, सज्रेराव अवसरमोल, पांडुरंग अवसरमोल, गुलाब डोंगरदिवे, शिवाजी लहाने, गजानन देशमुख उपस्थित होते.