शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उशीरा येणारे तूर पीक मातीमोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:43 IST

दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूरीला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे यंदा तूरीच्या उत्पादनात घट येण्याचे संकेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामात फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावरच आहे. परंतू सध्या धुक्यामुळे तूरीच्या शेंगा काळ्या पडण्यास सुरूवात झाली आहे. उशीरा येणाºया तुरीचे पिक मोतीमोल होत आहे. ५० टक्के फुले व शेंगा लागण्याची अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूरीला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे यंदा तूरीच्या उत्पादनात घट येण्याचे संकेत आहेत.जिल्ह्यात तूर पिकाचे सरासरी क्षेत्र ६५ हजार ५३ हेक्टर आहे. त्यापैकी यंदा ११८ टक्के म्हणजे ७६ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर तूरीचे पीक आहे. यामध्ये ४० टक्के तूर ही लवकर येणारी आहे. तर ६० टक्के तूर उशीरा येणारी आहे. सध्या लकवर येणाºया तूरीच्या शेंगा परिपक्व झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर शेंगा वाळण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अशा तूरीला धुक्याचा परिणाम जाणवत नाही. मात्र उशीरा येणाºया तूर पिकावर धुक्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६० टक्के तूर ही उशीरा येणारी आहे; जी तूर सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. काही तूर शेंगानी बहरलेली आहे. परंतू गेल्या आठवड्यापासून दुसऱ्यांदा जिल्ह्यात धुक्याची लाट निर्माण झाली आहे. हे धुके उशीरा येणाºया तूर पिकासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे फुलगळतीसोबतच तुरीच्या शेंगानाही नुकसानकारक ठरत आहे. अनेक तूरीच्या शेंगा काळ्या पडण्यास सुरूवात झाली आहे.वाढल्यालेल्या धुक्याने व ढगाळ वातावरणाने तूर पीक धोक्यात सापडले आहे. त्यामध्ये शेंगा पोखरणाºया अळीचाही बहुतांश ठिकाणी प्रादुर्भाव जाणवत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती