शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून तलाठी कार्यालयाचे भाडे थकीत!

By admin | Updated: June 30, 2017 00:39 IST

आंदोलन करण्याचा विदर्भ पटवारी संघाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : जिल्ह्यातील तलाठी कार्यालयाचे भाडे सन २०१२ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे याचा आर्थिक बोझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे. नियमितपणे घरभाडे मिळत नसल्याने काही घरमालकांकडून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्याने तलाठीवर्ग अडचणीत सापडला आहे. याची दखल घेऊन तातडीने या समस्येचा निपटारा करण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे.यानुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की जिल्ह्यातील अनेक तलाठी कार्यालये खासगी जागेमध्ये आहेत. शासनाने २०१३ पासून खासगी जागेची भाडेवाढ ग्रामीण भागासाठी एक हजार, तर शहरी भागासाठी दोन हजार रुपये अशी ठरविलेली आहे. त्यानुसार आजरोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुमारे चार कोटी रुपयांचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे जागा मालक व तलाठी यांच्यात वाद होत आहेत. तलाठ्यांनी खिशामधून हजारो रुपये भाड्यापोटी दिलेले आहेत. काही घरमालकांनी तलाठ्यांना घर खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तलाठी आॅनलाइन कामाने त्रस्त असताना घरमालकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्रास देणे सुरू केले आहे. त्यामुळे तलाठीवर्ग मानसिक विवंचनेत आहेत. याची दखल घेऊन तत्काळ थकीत भाडे शासनाकडून प्राप्त करून घेऊन जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे भाडे अदा करण्यात यावे, अन्यथा पहिल्या टप्प्यात प्रातिनिधिक स्वरूपात ३० जून रोजी चिखली तालुक्यातील सर्व तलाठी आपले तलाठी कार्यालय तहसील आवारात उघड्यावर चालवतील व १ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व तलाठी महसूल दिनावर बहिष्कार टाकून जिल्हधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करतील. इत:पर मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विदर्भ पटवारी संघाने दिला आहे.