शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा पिकावर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी हाेत आहे. किनगाव जट्टूसह परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही अळयांचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणापासून पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगाम चांगला येईल, असे वाटत असताना अतिवृष्टीने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला. खरीप हंगामात लागवडीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही. दरम्यान, परतीच्या पावसामुळे नदी-नाले, तलाव, विहिरीत जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, आदी पिके पेरली. त्यांना महागडी रासायनिक खते दिली. या पिकाची वाढसुद्धा चांगली झाली असून, हरभरा पिकाला घाटेसुद्धा लागले आहे. परंतु, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी कीटकनाशके फवारुनही अळी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.