शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोडावूनमध्ये साठविलेली तुरीची १४३ पोती लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

येथील अडत व्यापारी प्रेमराज प्रभुलाल भाला यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘भाला ट्रेडर्स’ या नावाने अडत दुकान आहे. याद्वारे ...

येथील अडत व्यापारी प्रेमराज प्रभुलाल भाला यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘भाला ट्रेडर्स’ या नावाने अडत दुकान आहे. याद्वारे खरेदी-विक्री केलेला माल साठविण्यासाठी ‘प्रभुजी वेअर हाऊस’ या नावाचे जालना रोडवर त्यांचे गोडावून आहे. यातील चौथ्या क्रमांकाच्या गोडावूनमध्ये अडतमध्ये घेतलेला हरभरा व तूर हा माल गेल्या महिन्यापासून त्यांनी साठवून ठेवला होता. १ क्विंटलची १०७२ पोती यामध्ये ठेवलेली होती. या गोडावूनमधील १४ ऑगस्ट रोजी कामकाज पार पडल्यानंतर १५ व १६ ऑगस्ट रोजी दोन दिवस शासकीय सुटीमुळे गोडावून बंद होते. याच काळात अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोंडून व आत प्रवेश करून १ क्विंटल तुरीने भरलेली एकूण १४३ (किंमत सुमारे ८ लाख ८६ हजार ६०० रुपये) पोती लंपास केली आहेत. १७ ऑगस्ट रोजी प्रेमराज भाला हे सकाळी १० वाजता वेअर हाऊसला चाब्या घेऊन पाहणीसाठी गेले असता, ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी प्रेमराज भाला यांनी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.