शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लखुजी राजे स्मृतीगौरव सोहळा

By admin | Updated: July 27, 2016 00:02 IST

सिंदखेडराजा येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुरस्कार सोहळा व तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): छत्रपती लखोजीराव जाधव यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिंदखेडराजा ऐतिहासिक शहरामध्ये शिवकालीन शस्त्रास्त प्रदर्शन, राजे लखुजीराव जाधव स्मृती पुरस्कार सोहळा, तसेच शहरामधून भव्य शोभायात्रा काढून स्मृतीदिन दोन दिवस मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये खासदार प्रतापराव जाधव, आ.डॉ.शशिकांत खेडेकर, ज्येष्ठ इतिहासकार डॉ.आ.ह.साळुंखे, अँड.श्रीमंत विक्रमसिंह जाधवराव यांचेसह असंख्य मान्यवर व जाधव कुळातील तसेच नागरीकांचा मोठा सहभाग होता.राजे छत्रपती लखुजीराव जाधव यांची ऐतिहासिक साक्ष देणारा भव्य राजवाडा व त्यांच्या मृत्यूनंतर बांधण्यात आलेली त्यांची जगप्रसिद्ध समाधी (वास्तु) आजही त्यांच्या कार्याची साक्ष देते. सन २00७ पासून त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. तर २0१५ मध्ये स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीदिनानिमित्त साडेतीनशे प्रकारचे शिवकालीन शस्त्रास्त प्रदर्शनीसाठी कोल्हापूर येथून आणण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांचे हस्ते आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये २४ जुलै रोजी पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहामध्ये करण्यात आले. तर जेष्ठ इतिहासकार आ.ह.साळुंखे, माजी आमदार तोताराम कायंदे, शिवाजी जाधव, राजेश जाधव, मा.प्राचार्य अरुण जाधव, माजी खासदार सुखदेव काळे, जगनराव ठाकरे, अँड.नाझेर काझी, अँड.श्रीमंत विक्रमसिंह जाधवराव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये २५ जुलै रोजी राजवाड्यापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. राजे लखुजीरावांची भव्य प्रतिमा असलेला रथ, राजे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभुषेत असलेले औरंगाबाद येथील रवि बोचरे व मावळ्यांच्या वेशभुषेत असलेले त्यांचे सर्व सहकारी तसेच जिजाऊंच्या वेशभुषेत असलेली उंबरद येथील जाधव कन्या शोभायात्रेतील लक्ष वेधून घेत होते.