शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या वेळेवर बसेसचा अभाव!

By admin | Updated: July 10, 2017 00:45 IST

भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : २७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातून व इतर ठिकाणावरून मुली शिक्षण घेण्यासाठी दररोज मेहकर येथे येत असतात. मात्र, शाळेच्या वेळेवर एसटी बसेस येत नसल्याने मुलींना शाळेत येण्यास उशीर होतो. त्यामुळे याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. मुलीच्या शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडा; अन्यथा भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप इलग यांनी दिला.मेहकर येथे विविध लहान-मोठ्या शिक्षण संस्था, कॉलेज, शाळा आहेत. खेड्यापाड्यातून तसेच इतर ठिकाणाहून मुली दररोज मेहकर येथे येत असतात. मुलींसाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र एसटी बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस केवळ मुलींना ने-आण करण्यासाठी सोडण्यात येतात; परंतु सदर बसेस शाळेच्या वेळेवर संबंधित गावात पोहचत नसल्याने मुली शाळेत वेळेवर पोहचू शकत नाहीत. त्यामुळे बसफेऱ्यांचे नियोजन कोलमडल्याने शाळेत जाण्यासाठी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसफेऱ्या वेळेवर सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे कोणत्याच प्रकारचे नियोजन नसल्याने एसटी वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. मनमानी पद्धतीने व आगाराच्या सोयीनुसार या बसफेऱ्या सोडण्यात येतात. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेवर मुलींना घरी जाण्यास वेळेवर बसेसची सुविधा होत नसल्याने बसस्थानकावर मुलींची गर्दी असते. मुलींना ताटकळत बसून बसेसची वाट पाहावी लागते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर मुलींना घरी जाण्यासाठी सुद्धा उशीर होतो. मानव विकासच्या बसेस शाळेच्या वेळेवर सोडा; अन्यथा भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप इलग, राजू निकम, शंकर गायकवाड, सदाम शाह, प्रा. केशवराव वाहेकर आदींनी दिला आहे. मुलींना खासगी वाहनाने करावा लागतो प्रवास!ग्रामीण भागातून मुलींना दररोज मेहकर येथे शिक्षण घेण्यासाठी यावे लागते; परंतु मानव विकासाच्या बसेस वेळेवर येत नसल्याने मुलींना शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे मुलींना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यासाठी मुलींच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. खासगी वाहनधारक व आगाराचे अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे की काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.