शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठी खाटांची संख्या कमी!

By admin | Updated: April 4, 2017 00:25 IST

आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरेचे पदे रिक्त आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही रुग्णालयात असणारी उपलब्ध खाटांची संख्या कमी आहे.

जिल्ह्याची स्थिती : ग्रामीण जनता आरोग्य सेवेपासून वंचित

नीलेश शहाकार - बुलडाणाजिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत असलेल्या त्रुटी नेहमीच चर्चेचा विषय राहली आहे. आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरेचे पदे रिक्त आहेत. शिवाय जिल्ह्यात दररोज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही रुग्णालयात असणारी उपलब्ध खाटांची संख्या कमी आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडत असून, बऱ्याच रुग्णांना सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यातील सार्वजनिक वैद्यकीय सुविधेचा आढाव घेतला असता, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णायांची संख्या २०, कॅन्सर, टी.बी. रुग्णालय एक, इतर शासकीय रुग्णालय ७५, प्रसूती गृह १३, प्राथमिक आरोग्य केंद्र ५२, उपकेंद्र २८० यातून ३५४ डॉक्टर व ९३४ परिचारिका रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. शहर व तालुक्याच्या ठिकाणच्या रुग्णालयात मूलभूत सुविधा असल्या, तरी प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत अद्यापही बऱ्याच सुविधा पोहोचल्या नाहीत.जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या या सर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १४९३ खाटांची सोय करण्यात आली आहे. आंतररुग्ण व बाह्य रुग्ण मिळून जिल्ह्यात दररोज एकूण ४०१० रुग्णांवर उपचार केला जातो. मात्र, रुग्णांच्या संख्येत खाटांची संख्या कमी असल्यामुळे शिवाय रिक्त पदांमुळे बऱ्याच वेळा रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा इतर जिल्हा रुग्णालयात हलविल्या जाते. ----------खासगी रुग्णालयाचा आधारजिल्ह्यात ४७६ खासगी रुग्णालय असून, येथे २२२० खाटांची सोय आहे. त्यामुळे शासकीय उपचारापासून वंचित राहिलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्या उपचार घेत, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे वेळवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे गत एक वर्षात जिल्ह्यात विविध आजार ४६० पुरुष व ३५० स्त्रिया असे ८१० जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे जिल्ह्याच्या सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. ----------आरोग्य विभागातील आरोग्य तपासणी यंत्र बंदजिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास ४६ प्रकाराचे विभाग असून, त्यामुळे विविध उपचार करण्यासाठी लहान-मोठी आरोग्य तपासणी यंत्रं उपलब्ध आहेत. मात्र, यातील इसीजी मशीन, सिटीस्कॅन मशीन, डायलेसीस युनिट, शिवाय अस्थि तज्ज्ञ विभाग, डोळे तपासणी विभाग, दिव्यांग तपासणी व नोंदणी विभागातील यंत्र तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळे बंद अवस्थेत पडून आहेत.