शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कृउबासचा प्रस्ताव पणन संचालकांनी फेटाळला!

By admin | Updated: June 12, 2016 02:15 IST

शेगाव मार्केट यार्डकरिता जमीन खरेदी प्रकरण; शेतमालकासोबतच्या तडजोडीस मान्यता नाही.

शेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिल प्रकरणात शेतमालकासोबत केलेल्या तडजोडीस महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १२ (१) अन्वये मान्यता मागितली असता कोणत्याही परिस्थितीत कार्योत्तर मान्यता देता येणार नसल्याचे आदेश पणन संचालक, पुणे यांनी दिले आहे. यामुळे बाजार समितीस चपराक बसली असल्याचे बोलल्या जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डकरिता जमीन मालक पुरुषोत्तम हरी पाटील अज्ञा. पालक ज्ञानेश्‍वर पुरुषोत्तम पाटील यांची शेगाव येथील सर्व्हे नंबर ३00/१ मधील ६ हेक्टर २५ आर पैकी ५ हेक्टर ११ आर जमीन विभागीय आयुक्त अमरावती यांची सुधारित अधिसूचना २२ ऑगस्ट १९८३ नुसार आरक्षित केली होती. सदर जागा रु. २५ हजार प्रती एकर मोबदल्याने बाजार समितीला देण्याबाबत जमीन मालकाने संमती दिली होती. या अनुषंगाने ज्ञानेश्‍वर पुरुषोत्तम पाटील यांना सन १९८0-८१ मध्ये तत्कालीन बाजार भावाच्या ८0 टक्के रक्कम बाजार समितीने देवून जमिनीचा ताबा देणेबाबत जमीन मालक यांनी संमती दिली होती. त्याचबरोबर जमीन अधिग्रहणाचे प्रकरण कायद्याचे तरतुदीनुसार सुरू झाल्यामुळे उर्वरित २0 टक्के रक्कम तसेच भूमिअधिग्रहण अधिकारी ज्या नियमानुसार मोबदला ठरवतील ती रक्कम बाजार समिती जमीन मालकास देईल असे लेखी कळविले होते; परंतु जमीन मालकाने मागितलेली २५ हजार रुपये एकर भाव न देता ५0 हजार रुपये हेक्टरी या भावाने एकतर्फी रक्कम जिल्हाधिकार्‍यांनी ठरविली होती. त्यानुसार १८ फेब्रुवारी १९८१ रोजी १ लाख ७0 हजार १६ हजार ८00 रूपये रक्कम जमीन मालक यांना देण्यात आली होती. त्यानंतर २२ ऑगस्ट १९८३ रोजी एमआरटीपी अँक्टप्रमाणे हेक्टरी रु. ३ लाख प्रमाणे शेतमालक ज्ञानेश्‍वर पाटील यांना ५ हेक्टर ११ हजार या जमिनीचा मोबदला रु. २५ लाख ९६ हजार २५५ असा तत्कालीन भूमिलेख अधिकारी डी.एन. रायपुरे यांनी निवाडा पारित करून मंजुरीकरिता शासनाच्या महसूल व वन विभागाकडे पाठविला होता.