शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधारे कुचकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:59 IST

खामगाव :  भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी व शेतकर्‍यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने कोल्हापुरी बंधार्‍यांची निर्मिती शासनाकडून करण्यात आली; परंतु या बंधार्‍यात पाणी अडविले जात नसून, बहुतांश बंधार्‍यांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देबहुतांश बंधार्‍यांमध्ये ठणठणाट फाटक नादुरुस्त असल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी व शेतकर्‍यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने कोल्हापुरी बंधार्‍यांची निर्मिती शासनाकडून करण्यात आली; परंतु या बंधार्‍यात पाणी अडविले जात नसून, बहुतांश बंधार्‍यांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.  सिंचन सुविधेत वाढ व्हावी, भूगर्भातील जलपातळी वाढावी, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खचरून कोल्हापुरी बंधार्‍यांची निर्मिती बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे; परंतु आज रोजी बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यांमध्ये असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांच्या स्थितीवर नजर टाकली असता, हे बंधारे कोरडेठण्ण पडलेले असून, कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात माहिती घेतली असता, अनेक बंधार्‍यांचे लोखंडी गेट चोरीस गेलेले आहेत. तर काही ठिकाणी गेटची तुटफूट झालेली आहे. त्यामुळे गेट लावूनही फायदा होत नाही. तसेच पावसाळ्यात बंधार्‍याचे गेट लावून घेण्याकडेसुद्धा संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बंधार्‍यांमध्ये ठणठणाट दिसून येतो. 

पालकमंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष! जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी मागिल आठवड्यात अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना कोल्हापुरी बंधार्‍यात पाणी अडवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यामध्ये बंधार्‍यांची उंची वाढवण्याचेसुद्धा त्यांनी सांगितले; परंतु पालकमंत्र्यांच्या या सूचनांकडेसुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. आज रोजी खामगाव तालुक्यासह घाटाखालील विविध तालुक्यांमधील कोल्हापुरी बंधार्‍यांमध्ये पाण्याचा ठणठणाट दिसून येतो.