शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

धामणगाव बढे येथे असाही जातीय सलोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:37 IST

धामणगाव बढे: येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला. आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहणारे समाज आज एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्याला मात्र धामणगाव बढे अपवाद आहे.

ठळक मुद्देगणेश मंडळ अध्यक्षपदी शेख अफसर

नविन मोदे

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे: येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला.आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहणारे समाज आज एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्याला मात्र धामणगाव बढे अपवाद आहे.येथे गेल्या ८ ते १0 वर्षांंपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविली जात आहे. यावर्षी मात्र एक पाऊल पुढे जात येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी येथील उपसरपंच शेख अफसर मो. शफी यांची निवड करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला.गावकर्‍यांनी त्याला पाठिंबा दिला आणि नवा आदर्श गावाने घालून दिला. ठाणेदार दीपक वळवी यांना याची माहिती मिळताच त्यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा उपविभागीय अधिकारी महामुनी, अप्पर जि.पो. अधीक्षक डोईफोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे धामणगाव बढे येथे मुस्लीम समाजाचा ईद मिलान कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान मंदिरात पार पडतो. तर येथे दोन मंदीर व मशीद अवघ्या ५0 फूट अंतरावर समोरासमोर आहेत.        हिंदू-मुस्लीम जनता एकमेकांच्या सणामध्ये उत्साहात सामील होतात. येथे कधीही कुणाला कीर्तनाचा, आरतीचा व अजानचा त्रास झालेला नाही. त्यामुळे धामणगाव बढेची सामाजिक एकता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे.

धामणगाव बढेचा उपक्रम जिह्यातील एकमेव आहे. येथील सामाजिक एकतेने दिलेला संदेश प्रेरणादायी आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते.- संदीप डोईफोडे, अप्पर जि.पो. अधीक्षक, बुलडाणा.