शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

शिकारी उठले आता खारूताईंच्या जिवावर!

By admin | Updated: April 22, 2016 02:24 IST

शिकारी टोळय़ा सक्रिय; वन्यजीव विभाग मात्र अनभिज्ञ.

संतोष आगलावे / बोरखेड (जि. बुलडाणा)लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर वन्य प्राण्यांसोबतच आता खारूताईंचीही शिकार मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. या गरीब जिवावर उठलेल्या शिकारींची टोळी परिसरात सक्रिय झाली असून, वन्यजीव विभाग यापासून अनभिज्ञ आहे.संग्रामपूर तालुक्यातील सगोडा परिसरात ससा, तितर, बटेर आणि रानडुकरांची कत्तल होणे हे नित्याचेच आहे; मात्र आता चक्क खारूताईंची कत्तल होताना दिसत आहे. हा संतापजनक प्रकार करणारी पाच ते सहा शिकारींची टोळी या परिसरात सक्रिय झाली आहे. खारूताईला पकडण्यासाठी प्रत्येक शिकार्‍याजवळ पाच ते सहा छोटे पिंजरे असतात. चिंच, बाभूळ, कडुनिंब आदी झाडांच्या बुंध्याशी हे शिकारी पिंजरे ठेवतात. त्या पिंर्ज‍यावर पोळीचा तुकडा ठेवतात. पोळीच्या वासाने खारूताई पिंर्ज‍याजवळ येते. तुकडा तोंडात घेताबरोबर, पिंजर्‍यातील स्प्रिंग सटकून तिच्या मानेवर त्याचा फटका बसतो आणि या चिमुकल्या जिवाचा जागेवरच मृत्यू होतो. एक शिकारी दिवसभरात १0 ते १२ खारूताईंची शिकार करतो. एका खारूताईचे वजन साधारणत: २५0 ते ३00 ग्रॅम असते. त्यातून १५0 ग्रॅम खाण्यायोग्य मांस मिळते. दिवसभर एका शिकार्‍याजवळ खारूताईचे दीड किलो मांस जमा होते.