शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व्रिकीसाठी झाले होते बाळाचे अपहरण: सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या बाळाचा शोध लागला असून, अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली.  खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या समांतर कारवाईत अवघ्या तीन दिवसांत अपहृत बाळाचा शोध ...

ठळक मुद्देखामगावातील अपहरण झालेले बाळ दिल्लीत !बाळ सुखरूप : पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली माहिती   

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या बाळाचा शोध लागला असून, अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली.  खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या समांतर कारवाईत अवघ्या तीन दिवसांत अपहृत बाळाचा शोध लागल्याने, पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, विक्रीसाठीच मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर असून, न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आल्याचे समजते.नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्याबी आतीकखान  यामहिलेचे ५ दिवसाचे बाळ २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता एका बुरखाधारी महिलेने पळविले. ही घटना उघडकीस येताच खामगाव शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आरोग्य प्रशासनाच्यावतीने गंभीर दखल घेत, परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. त्याचवेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकारणाचा समांतर तपास खामगाव शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासात ३ वेगवेगळ्या पथक तयार केले. यामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाने शोध घेवून औरंगाबाद येथील नवीन बायजी पुरा येथे सापळा रचून  बाळ चोरीसाठी वापरलेल्या वाहनाचा चालक राजे जहांगीर खान(४०), वाहन भाड्याने करून देणारा  इरफान खान बशीर खान (२८) दोघेही रा. नवीन बायजी पुरा यांना ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी केली असता राजे जहागीर खान याने २६ सप्टेंबर रोजी खामगाव येथून बाळ आणण्यासाठी इमरान खानच्या मदतीने गाडी भाड्याने घेतली होती. त्यामुळे  मोहसिन हुसेन खान उपजिल्हा सामान्य रुग्णालयासमोर भेटला, दोन महिलांनी रुग्णालयातून बाळ आणल्यानंतर ते औरंगाबाद येथे पोहोचले. दरम्यान, बाळ चोरीसाठी वापरलेल्या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती  उपरोक्त तिघांना मिळताच मुख्य आरोपी मोहसीन,   त्याची पत्नी प्रिती दाविद गायकवाड व तिची आई  वेदीका किशोर पिल्ले हे तिघे जण तेथून फरार झाले. दरम्यान, अपहृत बालक आणि दोन महिला सुरूवातीला मुंबई आणि तेथून दिल्ली येथे गेल्याचे समजल्यानंतर बालकाच्या शोधासाठी  सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाला दिल्ली येथे तर मोहसीनच्या शोधासाठी पोउपनि दिनकर गोरे यांच्या पथकाला मुंबई येथे रवाना करण्यात आले. तथापि, मुख्य आरोपी दौंड येथून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने दिनकर गोरे यांनी दौंड रेल्वे पोलिसांच्या संयुक्त मदतीने मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान (२१), त्याची पत्नी प्रिती दावीद गायकवाड (पिल्ले) रा. खामगाव यांना दौंड येथून ताब्यात घेतले. त्याचवेळी सपोनि मनोज केदारे व त्यांच्या पथकाने दिल्ली येथून मल्लिका बेगम पठाण हिंमत खान रा. बाजार सावंजी जि. औरंगाबाद, फिरदोस अस्लम आसमानी रा. गल्ल नं.९ वजीराबाद, दिल्ल यांना ताब्यात घेतले. बाळ पळविण्यासाठी वापरलेले वाहन ताब्यात घेवून चालक राजे जहांगीर खान, इरफान खान, यांना  सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून खामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

खामगाव पोलिसांकडून दुचाकी जप्तया प्रकरणात खामगाव पोलिसांनी जप्त केलेल्या एम.एच. २८ एन ९८१० ही दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली एम एच.४९ एफ १५९७ या गाडीचा चालक राजे जहांगीर खान हा इरफान खान याचा साळा असल्याची माहिती आहे.

खामगाव पोलिसांची पाच पथके!या गुन्ह्याच्या समातंर कारवाई खामगाव शहर पोलिसांनी ५ पथके विविध दिशेने रवाना केली होती.  यामध्ये एपीआय गाढे यांच्या पथकाने जवळपास १०० गाड्यांची तपासणी केली. तर धुळे, इंदोर आणि मुक्ताईनगर येथे पाठविण्यात आलेल्या पथकाने आपली कामगिरी बजावली. दरम्यान, एका पथकाची नेमणूक सीसी फुटेज तपासण्यासाठी करण्यात आली. या पथकाने विविध फुटेज बुलडाणा एलसीबीला दिले.