शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

िखली नगर परिषद हद्दवाढ प्रस्तावास मान्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

चिखली : अनेक दिवसांपासून रखडलेल्या चिखली नगर परिषद हद्दवाढ प्रस्तावाला राज्य शासनाने अखेर मान्यता दिली आहे. यानुषंगाने आमदार श्वेता ...

चिखली : अनेक दिवसांपासून रखडलेल्या चिखली नगर परिषद हद्दवाढ प्रस्तावाला राज्य शासनाने अखेर मान्यता दिली आहे. यानुषंगाने आमदार श्वेता महाले यांनी चालविलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ३० मार्च रोजी चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढी बाबत उपसचिव सतीश मुंडे यांच्या सहीने उद्घोषणा केली आहे. शासन निर्णय क्र.एमयूएन २०२०/ प्र.क्र. २०४/ नवि १८ मंत्रालय मुंबई अन्वये चिखली नगरपरिषद हद्दवाढीस मान्यता देण्यात आली आहे. सदर हद्दवाढ ही पूर्वेकडून चिखली भाग क्रमांक २ गट क्रमांक १६६, १६७, १६८, १७० ते १८०, उत्तर १७९ भाग एमायडिसी वगळून १८५, १९१, १९२ भाग एमायडिसी वगळून १९३ भाग एमआयडीसी वगळून १९४ ते २००, २०९ ते २२०, २२३ ते २३०. तर चिखली नगरपरिषदेच्या पश्चिमेकडील सर्वे क्रमांक व गट क्रमांक चिखली भाग २, ३७ ते ४५, ४९, ५०, ५२ ते ५४ तसेच उत्तरेकडील सर्वे क्रमांक व गट क्रमांक चिखली भाग २, १०७, १०८, १५२, १५३, १५६, १५७, १६१, १६२ १६५ आणि चिखली नगरपरिषदेच्या दक्षिणेकडील सर्वे क्रमांक व गट क्रमांक चिखली भाग २, ८ ते १३ व २० ते २२ अशाप्रमाणे प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे.

शहराची हद्दवाढ होण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी २२ नोव्हेंबर २०२० रोजी नगरविकास प्रधान सचिव यांना याबाबत पत्र दिले होते. सन १९८७ मध्ये मंजूर नगर परिषदेचे क्षेत्रफळ ७.८८९ चौ.कि.मी इतके आहे. सन १९८१ च्या जगगणनेनुसार चिखली शहराची लोकसंख्या २७ हजार ६०६ इतकी होती. तेंव्हापासून चिखली शहराची हद्दवाढ झालेली नाही. दरम्यान सन २०११ च्या जणगणनेनुसार चिखली शहराची लोकसंख्या ५७ हजार ८८९ इतकी आहे. तसेच नगर परिषद चिखलीहद्दी बाहेर झपाट्याने विस्तार होत असताना निवासी व वाणिज्य क्षेत्र निर्माण होत आहे. चिखली शहराच्या उत्पन्नाच्या दृष्टीने व वाढीव क्षेत्रातील नागरीकांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होत असलेल्या अडचणी सोडविण्याकरीता चिखली नगर परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारींमार्फत २२ आॅगस्ट २०१९ रोजी हद्दवाढीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आ.महाले यांनी १० मार्च २०२० रोजी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हद्दवाढीस मान्यता देणेबाबत पत्र दिले होते. दरम्यान या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी आ.महाले यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा चालविला होता. दरम्यान प्रस्तावातील त्रृटींचीदेखील पूर्तता करवून घेतली. याशिवाय आ.महाले यांनी विधीमंडळामध्ये तारांकित प्रश्न व कपात सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधलेले होते. अखेरीस त्यांच्या पाठपुराव्यास यश येवून शहर हद्दवाढीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी) शहर विकासाला गती मिळणार ! चिखली शहराची हद्दवाढ मंजूर झाल्याने झपाट्याने वाढत असलेल्या वाढीव भागात आता नागरी सुविधा देण्यासाठी सोईचे होणार आहे. हद्दवाढ अभावी नवीन वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते अशा मूलभूत सुविधांअभावी नागरीकांची गैरसोय होत होती. मात्र, आता हद्दवाढीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने वाढीव भागात नागरी सुविधा देण्याच्या अडचणी दूर होवून शहर विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास आ.श्वेता महाले यांनी व्यक्त केला आहे.