कोरोना महामारीमुळे १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे होणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यावर मर्यादा आल्याने मराठा सेवा संघाचे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी, सर्व जिजाऊप्रेमींनी आपापल्या गावातच व शक्यतोवर कौटुंबिक पातळीवर शक्य त्या पद्धतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. जिजाऊप्रेमींनी आवाहन करतानाच स्वत:देखील प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. स्थानिक मेहकर फाटास्थित माँ जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करतानादेखील मोजक्या व्यक्तींची उपस्थिती राहिल याचीही दक्षता यंदा शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी घेतली. १२ जानेवारी रोजी त्यांनी मेहकर फाटा, चिखली येथे माँ साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पत्नी माजी आ. रेखाताई खेडेकर, चंद्रशेखर शिकरे, आदींची उपस्थिती होती.
खेडेकर दाम्पत्याकडून जिजाऊंना अभिवादन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST