शेगाव (जि. बुलडाणा) : मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या शेगाव विकास आराखड्यातील कामे कंत्राट कंपन्या आणि बांधकाम अधिकार्यांच्या हलगर्जीमुळे रेंगाळली आहेत. वेळोवेळी नागरिकांना होणार्या त्रासाची जाणीव करून दिल्यानंतरही अधिकारी वर्गाकडून कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी शिवसेनेच्यावतीने शहरातील अग्रसेन चौकातील रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये बेशरमचे झाड लावून कंत्राट कंपन्या आणि सा.बां.अधिकार्यांचा निषेध नोंदविण्यात आला. शहरातील आर. डी.- ३ या अग्रसेन चौक ते आठवडी बाजारपयर्ंतच्या रस्त्याचे कंत्राट मुंबई येथील हल्को कंपनीला देण्यात आले आहे; मात्र कंपनीकडून दीड वर्षांपासून पूर्ण रस्त्यावर खड्डे खोदून ठेवल्याने या भागातील नागरिक त्रस्त आहेत. शिवाय या रस्त्यावर वाहने चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंत्राट कंपनीकडून होणारा विलंब आणि सा. बां. विभाग अधिकार्यांच्या हलगर्जीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यासाठी अधिकारी व कंत्राटदाराला जागे करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी सदर रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये बेशरमचे झाड लावून उपरोधिक आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, शहरप्रमुख संतोष घाटोळ, उपशहरप्रमुख गजानन हाडोळे, भावेश शर्मा, सुधाकर शिंदे, अमोल कांबळे, गोपाल मल, विलास उमाळे, रामेश्वर शेंडे, गोपाल मल, पवन सलामपुरीया यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.
खड्डय़ात लावले बेशरमचे झाड!
By admin | Updated: July 20, 2016 00:32 IST