शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

५४ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी

By admin | Updated: May 22, 2017 00:31 IST

खरीप पीक पेरणी नियोजन : गतवर्षीच्या तुलनेत १ हजार १५२ हेक्टरने वाढ

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुका कृषि कार्यालयाने तालुक्यातील खरीप पिक पेरणीचे नियोजन केले असून २०१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टर ने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५०० हेक्टर, तूर १०००० हेक्टर, मुग २००० हेक्टर, उडीद १५०० हेक्टर, सोयाबीन ३८००० हेक्टर, कपाशी २००० हेक्टर, इतर ५०० असे एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. पिक कर्ज मंजुरी झाल्यास लवकरच शेतात खरीप हंगामाच्या पेरणीचे काम चालू होणार आहे. यावर्षी सोयाबीन, तूर व इतर काही पेरणी क्षेत्र नियोजनामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. खरीप हंगाम पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे व खतांचे राज्य स्तरावरच प्रभावी नियोजन असल्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी गणेश गिरी यांनी दिली आहे. सन २०१६ मध्ये ५३ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. नियोजनानुसार ज्वारीचे २४८ हेक्टर वरून ५०० हेक्टर वर वाढ करण्यात आली आहे. तूरी चाही पेरा ९ हजार ५४६ हेक्टर वरून १०००० हेक्टर वाढला आहे. मुंग १ हजार ९४२ हेक्टर वरून २००० हेक्टर पेरण्यात येणार आहे. २०१६ मध्ये उडीदचे पेरणी क्षेत्र १ हजार ९१९ हेक्टर होते. मात्र यावर्षी उडीदचे ४१९ हेक्टर पेरणी क्षेत्र घटून १ हजार ५०० हेक्टर करण्यात आले आहे. सोयाबीनच्या पेरणीत वाढ होऊन ३७ हजार ७३६ हेक्टर वरून ३८००० हेक्टर झाले आहे. कपाशी १ हजार १४६ हेक्टर वरून २००० हेक्टर करण्यात आले आहे. इतर ५०० असे एकूण ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने तालुक्यात सोयाबीन, तुर, कपाशी व अन्य खरीपाच्या पिकाला चांगली झडती मिळाली. उत्पन्न चांगले वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या या मालाला यावर्षी चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी चांगलाच मेटाकूटीला आला. सध्या शेतकाऱ्यांना यावर्षीच्या पेरणीचे नियोजन करयाचे आहे. बँकांनी वेळेच्या आत कर्ज पुरवठा केला तर बळीराजा सुध्दा वेळेवर पेरणी करेल अन्यथा पुन्हा शेतकऱ्यांची फरफट आहेच. भुईमुगाच्या लागवडीत घटलोणार तालुक्यात सोयाबीन हेच प्रमुख पीक असून दरवर्षी तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. याशिवाय तालुक्यात खरिपात बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूगाचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विकास अधिकारी सह प्रत्येक चार तालुक्यांत एक या प्रमाणे एकूण सहा भरारी पथके आहेत.