शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील आठ रस्ते टाकणार कात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:09 IST

खामगाव: शहरातील  मुख्य आठ रस्त्यांची दशा पालटणार असल्याचे शुभसंकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत. या रस्त्यांच्या निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देनिविदा प्रक्रिया पूर्णत्वासरस्ते विकासासाठी पालिकेचा ३.२0 कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील  मुख्य आठ रस्त्यांची दशा पालटणार असल्याचे शुभसंकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत. या रस्त्यांच्या निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे दिसून येते.गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता, पालिका प्रशासनाकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. खामगाव पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या विविध रस्त्यांसोबतच शहराचा संपूर्ण विकास लक्षात घेता, रस्ता निधींतर्गत शहरातील प्रमुख आठ रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण आणि दुरुस्तीकामी प्रस्ताव तयार करण्यात आला. शहरातील नागरिकांना सोयी- सुविधा देण्यासाठी सर्वसमावेशक अशा प्रमुख आठ रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण आता करण्यात येणार आहे. 

ंया रस्त्यांचे पालटणार रूप!-  शहरातील भुसावळ चौक ते गौतम चौकपर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून, यासाठी १ लक्ष ७३ हजार रुपयांचा निधी खर्ची घालण्यात येईल. -  तलाव रोड ते गुरुद्वारापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी साडेसात लक्ष रुपये तर रायगड कॉलनीतील नांदुरा रोडवरील शुक्ला यांच्या घरापासून ते घाटपुरी रोड रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण आणि नाली बांधकामासाठी  साडेनऊ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. तर खेल का मैदान ते रेल्वे गेटपर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी साडेतीन लक्ष रुपयांचा निधी, राणा गेट ते नगरपालिका हद्दीपर्यंत फक्कड देवी मंदिर रस्त्यासाठी दोन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.-  तर हेंड पाटील यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यासाठी अडीच लक्ष रुपये, जोशी नगरातील सुराणा ते मलिरामा सेंटरजवळील आरस रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशन रस्त्याचेही भाग्य उजळणार!बसस्थानकासमोरील आणि शहरातील अतिशय वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन रस्त्याचेही भाग्य आता उजळणार आहे. या रस्त्यांवरील डबक्यांपासून नागरिकांची आता कायमची सुटका होणार असल्याचे संकेत आहेत.

रस्ते दुरुस्तीत भेदभाव नाही!शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करताना, सत्ताधारी नगरसेवकांप्रमाणेच विरोधी नगरसेवकांच्या परिसरातील रस्त्यांचाही समान विचार करण्यात आला. कोणताही भेदभाव न करता, रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येत आहे. खामगाव मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात शहरातील आठ रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरीकणास लवकरच गती दिली जाणार असून, या रस्त्यांची निविदा प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली आहे. शहराच्या सर्वसमावेश विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- अनिता डवरे, नगराध्यक्ष, खामगाव.