शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेच्या पाहुणचाराने भारावले वारकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:00 IST

तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारक-यांना श्रद्धेचा पाहुणचार केला.

ठळक मुद्देहजारो भाविकांनी केले ‘श्रीं’चे खामगावात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारकºयांना श्रद्धेचा पाहुणचार केला. श्रींच्या पालखीचे शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, धार्मिक आणि युवक मंडळीच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांची पायदळ वारी शेगाव येथून ११ जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करीत पालखी परतीच्या मार्गावर आहे. रजतनगरीत शनिवारी सकाळी अश्व, ध्वज व वारकरी बंधूंसह हरिनामाच्या जयघोषात व टाळ, मृदृंगाच्या गजरात श्रींच्या पालखीचे आगमन झाले. खामगाव बायपास रोडवरील हनुमान व्हिटामीन येथे पालखीचे आगमन होऊन येथे वारकºयांना सकाळचे भोजन देण्यात आले. काल्याचे कीर्तन होऊन श्रींची आरती झाली. यानंतर पालखी नगर परिक्रमासाठी निघाली. बाळापूर फैल, भुसावळ चौक, सरकी लाइन, मेन रोड, महावीर चौक, मित्र समाज छापखाना, शहर पोलीस स्टेशन रोड, नांदुरा रोडवरील टॉवर चौक, सिव्हिल लाइन, देशमुख प्लॉट, एकबोटे चौक, मेन रोड, फरशी येथून श्री संत गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा येथे पोहचली.वारक-यांसाठी प्रसादाचे वाटपपायी दिंडीत सहभागी असणाºया वारकºयांसाठी ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, दूध, केळी, फराळी चिवडा, शरबत, पाणी पाऊच, नारळ पाणी, वेफर्सचे पाकीट, जेवणाची भांडी ताट व ग्लास, पेढे, चिक्की, लाडू तसेच शिरा-पुरीचे जेवण देण्यात आले.शहा यांची श्रींच्या पालखीसोबत वारीशेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायदळ वारी करीत असून, त्यांना गजानन विजय ग्रंथातील अनेक ओव्या मुखोद्गत आहेत. त्यामुळे सातासमुद्रापार पोहचलेल्या श्रींच्या भक्तीला आता धर्माचेही बंधन उरलेले नसल्याची प्रचिती येत आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असून, शनिवार २९ जुलै रोजी पालखीचे खामगावात आगमन झाले. सदर पालखीमध्ये शेगाव येथील कविमनाचे रिक्षाचालक मेहबूब शहा यांचाही सहभाग दिसून आाला. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता मेहबूब शहा यांनी श्रींच्याविषयी त्यांच्या मनातील भक्तिभाव कथन केला. शेगाव रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक असणारे मेहबूब शहा हे भाविकांना संत गजानन महाराज मंदिर येथे पोहचून देण्याचे काम करतात. त्यामुळे ते स्वत:ला श्री संत गजानन महाराज व भाविकांमधील दुवा असल्याचे सांगतात. संत गजानन महाराजांविषयी श्रद्धा कशी काय निर्माण झाली, याबद्दल विचारणा केली असता मेहबूब शहा म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी गजानन महाराज हे अवलिया असल्याचे सांगितल्यापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी भक्तिभाव रुजू झाला व तो उत्तरोत्तर वाढत गेला. सन २०१३ पासून आपण लोणार ते शेगाव पायदळ वारी गजानन महाराजांच्या पालखीसोबत करीत आहोत, असे सांगून त्यांनी गजानन विजय ग्रंथातील काही ओव्याही म्हणून दाखविल्या.