शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खामगावकरांवर पाणी कपातीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:25 IST

खामगाव : खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा असून, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भविष्यात जाणवू शकते. त्यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यांतर्गत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे सध्या सातव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा नवव्या दिवसावर जाऊ शकतो. तसेच पाणीपुरवठय़ाची वेळही कमी होऊ शकते.

ठळक मुद्देअपुर्‍या जलसाठय़ामुळे करावे लागणार नियोजन पाणीपुरवठा लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पात केवळ २३ टक्के जलसाठा असून, पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भविष्यात जाणवू शकते. त्यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यांतर्गत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे सध्या सातव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा नवव्या दिवसावर जाऊ शकतो. तसेच पाणीपुरवठय़ाची वेळही कमी होऊ शकते.खामगाव शहराला गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो; परंतु यावर्षी खामगावसह धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडला नाही. संपूर्ण जिल्ह्यातच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्ञानगंगा धरणासह बहुतांश धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. ज्ञानगंगा धरणात फक्त २२.९६ टक्के एवढा जलसाठा असून, हा जलसाठा अपुरा असल्याचे दिसून येते. सध्या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची चिंता सतावू लागली आहे. धरणांमधील जलसाठय़ांवर अवलंबून असलेल्या विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. खामगाव शहराची तहान भागविणार्‍या ज्ञानगंगा धरणात सुध्दा अपुरा जलसाठा असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ शहरवासीयांवर येऊ शकते. भविष्यातील पाण्याची तजवीज करण्याकरिता पाणी कपातीसारखा कटू निर्णय पालिकेला घ्यावा लागणार आहे. परिणामी, पाणीपुरवठय़ाचा कालावधी लांबणे, पाणीपुरवठय़ाची वेळ कमी होणे अशा निर्णयांना सामोरे जाण्याची वेळसुद्धा शहरवासीयांवर येऊ शकते. 

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरजसंपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून, पाऊस नसल्याने शेतकर्‍यांसोबतच व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक धास्तावलेले आहेत. किमान पिण्यासाठी तरी पुरेसे पाणी मिळणार की नाही, अशी चिंता शहरवासीयांना सतावत आहे. त्यामुळे भविष्यात बिकट स्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, किंबहुना पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, याकरिता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे बनले आहे. पावसाळ्यात जलसंधारणाच्या कामांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत आग्रह धरला जात नाही. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ उन्हाळ्यात येत असते.

सध्या उपलब्ध जलसाठय़ाचा वापर जपून करणे गरजेचे आहे. याकरिता नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात येत असून, पाणी कपातीचा विचार सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला, तरी भविष्यात तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपून करावा व या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. -सतीशआप्पा दुडे, सभापती, पाणीपुरवठा विभाग