शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पारा भडकल्याने खामगावकरांना धारा!

By admin | Updated: May 28, 2017 04:18 IST

सूर्याने रोहिणी नक्षत्रात २५ मे रोजी प्रवेश केल्यापासून नवतपा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सूर्याने रोहिणी नक्षत्रात २५ मे रोजी प्रवेश केल्यापासून नवतपा सुरू झालेला असून, सूर्य आग ओकत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे आधीच ह्यहॉट सिटीह्ण असलेल्या खामगाव शहरातील रहिवाशांना नवतपा असह्य झाल्याचे दिसत आहे.खामगाव शहराचे तापमान फक्त बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात उच्चांक गाठत असते. त्यामुळे खामगावला हॉट सिटी म्हणून ओळख लाभलेली आहे. त्यातच यंदाचा उन्हाळा चांगलाच तापताना दिसत असून, २५ मेपासून ह्यनवतपाह्णस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे तापमान ४६ अंशाच्या पुढे गेले असून, एसी व कुलरसुद्धा काम करीत नसल्याचे दिसून येते. नागरिकांच्या अंगातून घामाचे लोट वाहताना दिसतात.असह्य बनलेला हा नवतपा २ जूनपर्यंंत कायम राहणार असून, तोपर्यंत सूर्याचा ताप सहन करावा लागणार असल्याचे दिसून येते, तर दुपारच्यावेळी उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. सायंकाळी मात्र एकाचवेळी नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत असल्याने बाजारात मोठी रेलचेल असते. चांगल्या पावसाचे संकेतज्योतिष शास्त्राच्या सिद्धांतानुसार नवतपामध्ये जास्त गर्मी होणे हे चांगल्या पावसाचे संकेत आहेत. याउलट नवतपात गर्मी नसेल, तर पाऊस चांगला होणार नाही, असे मानले जाते. यावर्षी नवतपामध्ये सूर्याचा ताप जास्त जाणवत असल्याने ज्योतिष शास्त्रानुसार हे चांगल्या पावसाचे लक्षण आहे.काय असतो नवतपा ?मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य व पृथ्वीमधील अंतर कमी होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढते. यावेळी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. हे नक्षत्र १५ दिवस राहते. पण, सुरुवातीचे नऊ दिवस उन्हाची प्रखरता अधिक जाणवते. यावेळेस २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून, तो ३ जूनपर्यंंत या नक्षत्रात राहणार आहे.