शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

खामगाव- सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट!

By admin | Updated: July 17, 2017 18:59 IST

खामगाव पालिकेचा ऐतिहासिक निर्णय: शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांचाही समावेश

अनिल गवई / खामगावसंरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय खामगाव नगर पालिकेने घेतला आहे. मालमत्ता करात सूट देत, सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी खामगाव नगर पालिका जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरली आहे.खामगाव नगर पालिकेतंर्गत शासनसाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग देण्यासाठी वृक्ष संगोपनाचाही कंत्राट देण्यात आला आहे. तीन वर्षांपर्यंत किमान ८० टक्के झाडांचे संगोपन न झाल्यास, संबधीत कंत्राटदाराचे देयक नाकारण्याचा ऐतिहासिक ठराव खामगाव पालिकेने याआधीच पारीत केला आहे. या महत्वपूर्ण ठरावासोबतच सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या, बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खामगाव नगर पालिकेने आणखी एक ऐतिहासिक ठराव घेतला आहे. माजी सैनिकांच्या विधवांसोबतच संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांनाही मालमत्ता करातून सूट दिली जाणार आहे. यामाध्यमातून खामगाव पालिकेच्यावतीने शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांचा यथोचित गौरव होत असतानाच, देशासाठी बलिदान, सेवा देणाऱ्या सैनिकांप्रती आत्मियताही प्रकट झाली आहे. माजी सैनिकांच्या विधवांसोबतच उत्कृष्ठ कामांमुळे शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वांनुमते हा ठराव पारीत करण्यात आला आहे.नगर पालिकेचे कोणतेही नुकसान नाही!महाराष्ट्र शासन अधिनियम १९६५ चे कलम १०६ च्या पोट कलम (१), (२) अन्वये नगर पालिकेने विनिर्दिष्ठ करण्यात आलेल्या करापासून कोणत्याही वर्गातील मालमत्तेच्या किंवा व्यक्तीच्या संबधात सूट देवू शकते. देण्यात आलेल्या सूट मुळे, नगर परिषदेला येणाऱ्या तुटीची प्रतिपूर्ती शासनाकडून परत करता येईल. यासंदर्भात सूट देण्याचा शासनाचा अद्यादेशही आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेचे कोणतेही नुकसान होणार नाही.दिवाबत्ती तक्रारींसाठी पालिकेची हेल्पलाईनखामगाव शहरातील स्ट्रिट लाईटसंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांना आता पालिकेत येण्याची गरज नाही. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवाबत्ती संबधीत तक्रारी आता घरबसल्या करता येणार आहे. परिसरातील पथदिवे बंद असल्यास ७५१७०६०६०१/ ७५१७०४०५०१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा अतिशय चांगला ठराव सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला विशेष बाब, सामाजिक जाणिव म्हणून बहुमताने मंजुरी देण्यात आली.- अनिताताई डवरे, नगराध्यक्षा, खामगाव