शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

खामगाव तालुक्यात 'पशुधन'चा कारभार प्रभारींच्या खांद्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:12 IST

Khamgaon News तालुका पशुधन विकास ( विस्तार ) अधिकारी यांची बदली करण्यात आल्याने ही पदे रिक्त झाली आहेत.

- सचिन बोहरपी लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअडगाव  : तालुक्यातील कार्यरत पाच पशुधन विकास अधिकाऱ्यांसह पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास ( विस्तार ) अधिकारी यांची बदली करण्यात आल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. सद्य:स्थितीत या पदाचा कारभार अतिरिक्त प्रभारावरच सुरू आहे. बदली झालेल्या ठिकाणी नवीन पशुधन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही.  त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे. तालुक्यात एकूण १४८ गावे असून, यापैकी १३२ आबाद, तर १६ उजाड गावे आहेत. १९वी पंचवार्षिक पशुगणना २०१२ नुसार तालुक्यात २ लाख ५ हजार पशुधन आहे. या पशुधनाच्या सेवेसाठी खामगाव येथे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पिंपळगावराजा, शिरला नेमाने, लाखनवाडा, पळशी बुद्रूक व बोथाकाजी येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, तर वर्णा, घारोड, गणेशपूर, बोरी अडगाव, बोरजवळा, कोलोरी व रामनगर येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ आहेत. सद्य:स्थितीत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय खामगाव पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. एच. बोहरा यांची पदोन्नतीने बदली झाल्याने हे पद रिक्त झाले या पदाचा अतिरिक्त प्रभार पशुधन पर्यवेक्षक डॉ. राजेश अवताळे सांभाळत आहेत. त्यांच्याकडेच पिंपळगावराजा दवाखान्याचा प्रभारही देण्यात आला आहे. बोथाकाजी येथील दवाखान्याचा प्रभार बोरी अडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. संदीप मसने यांच्याकडे आहे. लाखनवाडा दवाखान्याचा प्रभार पळशी बु. येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांच्याकडे आहे. शिरला नेमाने येथील दवाखान्याचा प्रभार कोलोरी येथे कार्यरत पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनील खोट्टे पाहत आहेत. पशु चिकित्सालय डॉक्टरविना रिकामे राहत असतील तर जनावरांचे उपचार कोण करणार? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे . त्यातच सद्य:स्थितीत पशुगणना सुरू झाली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा