शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यात पीक कर्ज वाटप केवळ २५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:59 IST

२३ जूनपासून रोजी केवळ १५ टक्के असलेले पीक कर्ज वाटप ११ जुलै रोजी केवळ २५ टक्के असल्याची माहिती आहे.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरिपातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची अंत्यत आवश्यकता असताना खामगाव तालुक्यात पीक कर्ज वाटपाची गती कमालीची मंदावली आहे. २३ जूनपासून रोजी केवळ १५ टक्के असलेले पीक कर्ज वाटप ११ जुलै रोजी केवळ २५ टक्के असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना पीक कर्ज तातडीने वाटप करण्याच्या सूचना दिल्यानंतरही हा प्रकार घडत आहे.खामगाव तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचे चित्र पाहता शनिवारपर्यंत २१९०६ पैकी ५५१९ शेतकºयांनाच वाटप झाले आहे. महाआघाडी शासनाने दिलेल्या कर्जमाफीमध्ये कर्जमुदतीच्या कालावधीत बदल केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. त्या पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या खात्यांचे प्रमाणीकरण कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अडकले. तसेच थकीत शेतकºयांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा झाल्याशिवाय त्या शेतकºयाला कर्ज न देण्याचा पवित्रा बँकांनी घेतला.त्यावर उपाय म्हणून प्रमाणीकरण रखडलेल्या शेतकºयांसाठी शासनाने सहकार विभागाकडून पीक कर्जाची हमी घेण्याचा उपाय योजला. त्यालाही बँकाकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता शासनाने ७ हजार कोटींपैकी जवळपास पाच हजार कोटींची रक्कम संबंधित जिल्हाधिकाºयांना दिली आहे. त्यानुसार बँकांनी पीक कर्ज वाटप गतीने करणे आवश्यक असताना खामगाव तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र बँकांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.विशेष म्हणजे, खामगाव शहरासह ग्रामीण भागात असलेल्या बँकांच्या शाखांना प्रत्येकी १२६६ शेतकरी खातेदारांना कर्जवाटप करण्याचा लक्षांक आधी देण्यात आला. त्यामध्ये मोठाच घोळ झाल्याने पीक कर्ज वाटपाची टक्केवारी कमी असल्याचे आधी प्रशासनाला वाटले. त्यामुळे बँकांच्या लक्षांकामध्ये सुधारणा करण्यासाठीची बैठक खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी २४ जून रोजी घेतली होती. त्यावेळी बँकांच्या प्रतिनिधींनी नव्या लक्षांकानुसार पीक कर्ज वाटप करण्याचे ठरवण्यात आले. तरीही त्यामध्ये फारसा फरक पडला नसल्याचे चित्र कर्जवाटपाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrop Loanपीक कर्ज