शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

खामगाव नगर पालिका : आधी करोडपती, आता लखपतीचेही वांदे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 09:54 IST

नोटाबंदीच्या काळात कर वसुलीत अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत ‘करोडपती’ झालेल्या खामगाव नगर पालिकेचे यावर्षी तब्बल सात महिन्यांच्या कालावधीत ‘लखपती’ होण्याचेही वांदे आहेत.

ठळक मुद्देकर वसुलीसाठी नगर पालिकेची दमछाक

अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नोटाबंदीच्या काळात कर वसुलीत अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत ‘करोडपती’ झालेल्या खामगाव नगर पालिकेचे यावर्षी तब्बल सात महिन्यांच्या कालावधीत ‘लखपती’ होण्याचेही वांदे आहेत. त्यामुळे कर वसुलीचे उद्दीष्ट गाठताना पालिकेची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते.सन २०१७-१८ मध्ये थकीत आणि चालू एकत्रित मालमत्ताकराचे ८ कोटी ५५ लक्ष ७१ हजार २३४ रुपयांचे उद्दीष्ठ ठरविण्यात आले. या उद्दीष्टाचा पाठलाग करताना करवसुलीसाठी पालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असून, एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत पालिकेची केवळ ७८ लक्ष ८८ हजार ७९८ रुपयांची वसुली केली असून, आतापर्यंत करण्यात आलेल्या रक्कमेची टक्केवारी केवळ ९.२२ टक्के एवढीच आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये एकत्रित मालकत्ता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाचा कडक उपाययोजना करावी लागणार असल्याचे संकेत आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या वसुलीच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली असमाधानकारक  असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. एकत्रित मालमत्ताकरामध्ये शिक्षणकर, वृक्षकर रोजगार हमी उपकर समावेश आहे. तर कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीही थकीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.