शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिका मुख्याधिकारी नामवाड निलंबित

By admin | Updated: February 19, 2016 01:31 IST

खामगाव येथील गणेशमूर्ती विटंबना प्रकरण; नगर विकास मंत्रालयाने केली कारवाई.

खामगाव : नगर परिषदेच्या फिरत्या जलकुंडात शहरवासीयांनी विश्‍वासाने विसजिर्त केलेल्या गणेशमूर्ती डंपिंग ग्राऊंडवर फेकून विटंबना केल्याप्रकरणी येथील नगर परिषदचे मुख्याधिकारी धोंडिबा नामवाड यांना नगर विकास मंत्रालयाने राज्यपाल यांच्या आदेशावरून एका पत्राद्वारे निलंबित केले आहे. या कारवाईमुळे नगर परिषद व तरुळात एकच खळबळ उडाली. मागीलवर्षी २९ सप्टेंबर १५ रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी नगर परिषदेच्या फिर त्या जलकुंडात विसजिर्त केलेल्या गणेशमूर्ती नगर परिषदने डंपिंग ग्राऊंडवर कचर्‍यात टाकून विटंबना केली होती. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखवून त्यांचा नगर परिषद प्रशासनाने विश्‍वासघात केला, अशा आशयाची तक्रार दत्तगुरू गणेश मंडळाचे अध्यक्ष ओम शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तर भाजयुमोचे राम मिश्रा यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली हो ती. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी मुख्याधिकारी धोंडीबा नामवाड, नगराध्यक्ष अशोक सानंदा यांच्यासह इतरांविरोधात कलम २९५, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ.भाऊसाहेब फुंडकर यांनी नागपूर अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून कारवाई करण्याची मागणी केली होती.