शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी, नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:06 IST

khamgaon municipal council : उपस्थितांसमोरच नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगरपालिकेतील विकासकामांमधील दिरंगाईबाबत सोमवारी दुपारी एक नगसेवक आणि दोन भाजप पदाधिकारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले.  यावेळी काही मुद्दयांवरून मुख्याधिकारी आणि उपस्थितांपैकी एका भाजप नगरसेवकाची असहमती झाली. त्यामुळे उपस्थितांसमोरच नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. खामगाव नगरपालिकेतील विकासकामे आणि ढेपाळलेल्या कारभाराबाबत भाजपचे एक नगरसेवक, पालिकेचे कामकाज चालविणारे कारभारी आणि दुसरे एक भाजप पदाधिकारी असे तिघे दुपारी तीन-साडेतीन वाजता दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले. यावेळी विकासकामांसोबतच काही मुद्दयांवर मुख्याधिकारी आणि उपस्थितांमध्ये चर्चा झाली. प्रशासकीय मुद्दा हाती लागताच उपस्थित नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही असंवैधानिक कामावरून मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधिताला चांगलेच सुनावले, तसेच वैतागून ‘आपली इच्छा असेल तर मी उद्यापासून पालिकेत येत नाही.’ मात्र, चुकीच्या कामांना अजिबात समर्थन करणार नसल्याचेही स्पष्ट केले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील वातावरण तापल्याचा ‘वणवा’ पालिकेत सर्वदूर पसरला. मोठमोठ्याने आवाज ऐकू येत असल्याने कर्मचारी आणि अधिकारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाच्या दिशेने धावले. 

भाजप पदाधिकाऱ्यांतच मतभिन्नता!नगरपालिकेतील ढेपाळलेला कारभार आणि विकासकामातील दिरंगाईबाबत मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांच्याशी माजी पदाधिकारी तथा नगरसेवक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी एका भाजप पदाधिकाऱ्याने मौन राहणे पसंत केले. त्याचवेळी दुसऱ्या एका भाजप पदाधिकाऱ्याने (कारभारी दादाने) मुख्याधिकाऱ्यांची बाजू सावरून धरली. त्यामुळे खडाजंगी दरम्यान उपस्थित असलेल्या तिघांमध्येच मतभिन्नता दिसून आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली. दरम्यान, वर्षभरापूर्वीच या नगरसेवकाचे भाजप पदाधिकाऱ्याशी बिनसले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांवर हावी झालेल्या नगरसेवकाला तोंडघशी पाडत, या पदाधिकाऱ्याने जुना वचपा काढल्याची जोरदार चर्चा पालिकेत या घटनेनंतर रंगली.

टॅग्स :khamgaonखामगावPoliticsराजकारण